'नाडा'च्या सुनावणीस सेहवागची अनुपस्थिती 

वृत्तसंस्था
Monday, 30 July 2018

गेल्यावर्षी 9 नोव्हेंबरला सेहवागचा नऊ सदस्यीय उत्तेजक विरोधी सुनावणी समितीत समावेश करण्यात आला होता. यात न्यायाधीश आर. वी. ईश्‍वर हे मुख्य असून, वकिल विभा दत्त मखिजा, दिल्लीचा माजी कर्णधार विनय लांबा, डॉ. नवीन दंग र्आणि डॉ. हर्ष महाजन यांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली : उत्तेजक विरोधी सुनावणी समितीत समावेश केल्यानंतरही वीरेंद्र सेहवाग अजून एकाही सुनावणीस उपस्थित राहिला नसल्याचे समोर आले आहे. 

गेल्यावर्षी 9 नोव्हेंबरला सेहवागचा नऊ सदस्यीय उत्तेजक विरोधी सुनावणी समितीत समावेश करण्यात आला होता. यात न्यायाधीश आर. वी. ईश्‍वर हे मुख्य असून, वकिल विभा दत्त मखिजा, दिल्लीचा माजी कर्णधार विनय लांबा, डॉ. नवीन दंग र्आणि डॉ. हर्ष महाजन यांचा समावेश आहे. 

उत्तेजक सेवन प्रकरणात "नाडा'ने केलेल्या कारावाईला आव्हान देण्यासाठी देशातील उत्तेजक विरोधी सुनावणी समिती ही सर्वोच्च मानली जाते. मात्र, नव्या समितीची नियुक्ती झाल्यापासून सेहवाग एकाही सुनावणीस उपस्थित राहिलेला नाही. सेहवागने समितीचा राजीनामा दिलेला नाही. तो अजूनही समितीचा एक भाग आहे. अर्थात, तो आतापर्यंत एकाही सुनावणीस उपस्थित राहिलेला नाही, हे देखील सत्य आहे. अन्य सदस्य एका पेक्षा अधिक सुनावणीस उपस्थित राहिले आहेत. 

या समितीने उपस्थितीविषयी विचारलेल्या एकाही संदेशाला सेहवागने साधे उत्तरही दिलेले नाही. विशेष म्हणजे नव्या समितीसमोर पॉवरलिफ्टर सरिता राणी, बॉक्‍सिंग खेळाडू रंजन मुमगी आणि व्हॉलीबॉल कुमार खेळाडू आयुष यांच्या सुनावणी झाल्या आहेत. 
"नाडा'च्या संकेतस्थळावर मात्र या सुनावणी सुरू होण्यापूर्वीच सेहवागने उपलब्धतेविषयी सलवत मागितल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या