अंकुर मित्तलचे डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण 

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

मुंबई : ऑलिंपिकमधून वगळलेल्या डबल ट्रॅप प्रकारात अंकुर मित्तलने जागतिक नेमबाजी स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवले. त्याच्या या यशामुळे वरिष्ठ गटातील सुवर्णपदकांचा दुष्काळ संपला असला तरी ऑलिंपिक कोटाची प्रतीक्षा कायम आहे. 

मुंबई : ऑलिंपिकमधून वगळलेल्या डबल ट्रॅप प्रकारात अंकुर मित्तलने जागतिक नेमबाजी स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवले. त्याच्या या यशामुळे वरिष्ठ गटातील सुवर्णपदकांचा दुष्काळ संपला असला तरी ऑलिंपिक कोटाची प्रतीक्षा कायम आहे. 

कोरियात सुरू असलेल्या या स्पर्धेत अंकुरने 150 पैकी 140 गुण मिळवले. चीनचा यियांग यांग, स्लोवाकियाचा हुबर्ट आंद्रेझ आणि अंकुरचे समान गुण झाले. अंकुरने यियांगला 4-3 मागे टाकत सुवर्णपदक जिंकले, तर हुबर्ट शूट-ऑफच्या दुसऱ्या प्रयत्नात दोन्ही टार्गेट चुकला, त्यामुळे त्याला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. अंकुरने मोहम्मद आसाब आणि शार्दूल विहानच्या साथीत सांघिक ब्रॉंझ जिंकले. भारताचे 409 गुण झाले. इटली (411) आणि चीनने (410) चुरशीच्या स्पर्धेत भारतास मागे टाकत पहिले दोन क्रमांक मिळवले. 

दहा मीटर एअर रायफलमध्ये ऑलिंपिक कोटा मिळवलेली अंजुम मौदगिल पन्नास मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात नववी आली. तिचे 1170 गुण झाले.

स्वित्झर्लंडच्या निना ख्रिस्तियन हिने अचूक शॉट्‌सच्या स्पर्धेत अंजुमला 66-56 असे मागे टाकत अंतिम फेरी गाठली. मनू भाकर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत दहावी आली. या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यानंतर मनूसह चौघींचे समान गुण होते. मात्र अचूकतेमध्ये मनू (16) तळाला गेली आणि तिची अंतिम फेरी हुकली. 

अन्य भारतीयांची कामगिरी 
- मनीषा किर-मानवादित्यसिंग राठोड मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत चौथे. 
- भारतीय जोडीचे 24 गुण, तर सुवर्णपदक विजेत्या इटलीच्या जोडीचे 42. 
- प्राथमिक फेरीत 139 गुणांसह भारतीय दुसरे. 
- 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत राही सरनोबत (31-579) आणि हीना सिद्धू (43 - 575) अंतिम फेरीपासून दूर. 
- मनू, हीना आणि राहीचा भारतीय संघ सहावा. 
- कुमारी गटात भारतीय टॉप टेनमध्ये नाहीत, सांघिक क्रमवारीत सहावे. 
- अरुणिमा गौर (13 - 571), देवांशी राणा (17- 569) आणि मुस्कान (38 - 554) अंतिम फेरीपासून दूरच. 
- डबल ट्रॅपच्या प्राथमिक फेरीत महम्मद आसाब (135) सातवा, तर शार्दूल विहान (134) पंधरावा. 
- पन्नास मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये एन गायत्री (22-1166) अपयशी. 

पदकतक्ता 

देश सुवर्ण रौप्य ब्रॉंझ एकूण 
कोरिया 9 7 7 23 
चीन 7 9 4 20 
भारत 7 7 6 20 
रशिया 6 6 9 21 
इटली 6 1 4 11 


​ ​

संबंधित बातम्या