नेमबाज अंजुम मुद्गिल, अपूर्वी चंडेला टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

वृत्तसंस्था
Monday, 3 September 2018

इंडोनेशियात नुकत्याच पार पडलेल्या 18व्या आशियाई स्पर्धेनंतर भारताच्या नेमबाज अंजुम मुद्गिल आणि अपूर्वी चंडेला यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा नेमबाजी महासंघाच्या जागतिक स्पर्धेतही उत्तम कामगिरी आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्या दोघींचेही 2020मध्ये होणाऱ्या टोकीयो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले आहे. 

चांगोन : इंडोनेशियात नुकत्याच पार पडलेल्या 18व्या आशियाई स्पर्धेनंतर भारताच्या नेमबाज अंजुम मुद्गिल आणि अपूर्वी चंडेला यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा नेमबाजी महासंघाच्या जागतिक स्पर्धेतही उत्तम कामगिरी आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्या दोघींचेही 2020मध्ये होणाऱ्या टोकीयो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले आहे. 

अंजुम आणि अपूर्वी या दोघींनीही जागतिक स्पर्धेत अनुक्रमे दुसरा आणि चौथा क्रमांक पटकावला आहे. या जागतिक स्पर्धेचे यंदा 52वे वर्ष असून ती दक्षिण कोरियात सुरु आहे. 

या स्पर्धेत अंजुमने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, तर अपूर्वीने याच प्रकारात चौथे स्थान पटकावले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे 2020मधील टोकियो ऑलिम्पिकमधील स्थान पक्के झाले आहे. भारताकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान पक्के करणाऱ्या या पहिल्या स्पर्धक आहेत. 

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मिश्र दुहेरीत ब्रॉंझ पदक पटकावणाऱ्या अपूर्वी आणि रवी कुमार यांना जागतिक स्पर्धेत मात्र सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच दिपक कुमार आणि मेहुली घोष यांना 25व्या स्थानावर समाधान मानावे लागले.


​ ​

संबंधित बातम्या