'चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम पदार्थ वापरण्याऐवजी हा प्रयोग करता येईल'

टीम ई-सकाळ
Thursday, 4 June 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी यासंदर्भात शिफारस केली होती. त्यानंतर चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी कृत्रीम पदार्थाचा वापर करण्याबाबतची चर्चा जोर धरु लागली आहे. या विचाराला कुबळेंनी विरोध दर्शवला आहे.

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खेळाची मैदाने दोन महिन्यांहून अधिक काळ स्तब्ध आहेत. कोरोनाजन्य संकटातून सावरुन हळूहळू पुर्वपदावर येण्याच्या दृष्टिने खेळ जगतात आता हालचाली सुरु झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या जगभरातील प्रादुर्भावानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरताना गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण चेंडू स्विंग करण्यासाठी त्याची चमक कायम ठेवण्यासाठी गोलंदाजाला आता थूंकीचा वापर करता येणार नाही. 

बाळामुळं हा खेळाडू टाळेबंदीनंतरच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी यासंदर्भात शिफारस केली होती. त्यानंतर चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी कृत्रीम पदार्थाचा वापर करण्याबाबतची चर्चा जोर धरु लागली आहे. या विचाराला कुबळेंनी विरोध दर्शवला आहे. चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी कृत्रीम पदार्थाचा वापर करण्याऐवजी खेळपट्टीमध्ये काही बदल करण्याबाबत विचार करायला हवा, असे अनिल कुंबळे यांनी म्हटले आहे.   

वर्णभेदाच्या मुद्यावर केअएल राहुलने शेअर केली भावनिक पोस्ट

कुंबळे म्हणाले की, खेळ पुन्हा सुरु झाल्यानंतर खेळपट्टी तयार करताना फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कोरोना विषाणूमुळे मैदानात चेंडूला चमक आणण्यासाठी थूंकी लावण्यावर निर्बंध घालावे अशी शिफारसीवर अनेक आजी-माजी क्रिकेटर्संनी कृत्रीम पदार्थाचा वापर करुन यावर पर्याय काढता येईल, असे म्हटले होते. यात भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश होता. मात्र कुंबळे यांनी याल असहमती दर्शवली होती. 
आपल्या भूमिकेवर कुंबळे अद्यापही ठाम आहेत.

दुसऱ्यांदा पुरस्कारासाठी शिफारस न केल्याने खेळाडूचा संताप, म्हणाला हा देश म्हणजे विनोद आहे!

ते म्हणाले की, क्रिकेटमध्ये तुमच्याकडे खेळपट्टी हा एक महत्त्वाचा घटक आहे. खेळपट्टीच्या माध्यमातून आपल्याला फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात संतुलन ठेवता येऊ शकते. चेंडूची चमक राखण्यासाठी थूंकी लावण्यावरील निर्बंधामुळे कसोटी सामन्यात गोलंदाजांना अधिक कष्ट घ्यावे लागतील, असेही कुंबळे यांनी म्हटले आहे. 
गोलंदाजांसमोर निर्माण होणारे संकट कमी करण्यासाठी खेळपट्टीवर गवत ठेवता येईल. शिवाय संघात अतिरिक्त फिरकीपटूला खेळवावे लागेल. एकदिवसीय आणि टी20 मध्ये चेंडूची चमक कायम ठेवण्याची फारशी चिंता नसते. कसोटीत मात्र हे मोठे आव्हान असते. नव्या निर्बंधासह मैदानात उतरताना नवे प्रयोग करण्यावर भर द्यावा लागेल, असा सल्लाही कुंबळेंनी दिला आहे.  


​ ​

संबंधित बातम्या