IPL 2020 : टीम इंडियाने हकाललेल्या प्रशिक्षकाकडे आता किंग्ज एलेव्हन पंजाबची धूरा

वृत्तसंस्था
Saturday, 12 October 2019

आयपीएलच्या पुढील मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने कुंबळे यांची क्रिकेट संचालक पदावर नियुक्ती केली आहे. पंजाब यंदाच्या मोसमात विजेतेपद मिळविण्यात अत्यंत उत्सुक असणार आहे. 

नवी दिल्ली : विराट कोहलीचं त्यांच्यासोबत जमत नाही, खेळाडूंना ते फारशा सवलती देत नाहीत आणि म्हणूनच कोहलीच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरुन जवळपास त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आता भारतीय संघाने हाकललेल्या याच गुणी प्रशिक्षकाला किंग्ज इलेव्हन पंजाबने आपला क्रिकेट संचालक म्हणून नेमले आहे. आता पर्यंत हा प्रशिक्षक कोण हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

त्याचा साष्टांग नमस्कार पाहून रोहितचाही तोल गेला

होय आम्ही अनिल कुंबळेविषयी बोलत आहोत. आयपीएलच्या पुढील मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने कुंबळे यांची क्रिकेट संचालक पदावर नियुक्ती केली आहे. पंजाब यंदाच्या मोसमात विजेतेपद मिळविण्यात अत्यंत उत्सुक असणार आहे. 

Anil Kumble

पंजाबने यापूर्वी एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकाविलेले नाही. त्यामुळेच त्यांनी यावर्षी सर्व सपोर्ट स्टाफ बदलण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच कुंबळेच्या प्रशिक्षणाखाली पंजाबचा संघ कसा कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

ज्याला संघातून डावलंल त्यांनेच करुन दाखवलं!

''आमच्या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी आम्हाला कुंबळेच योग्य वाटतात. त्यांचे क्रिकेटमधील आणि प्रशिक्षणाचे कौशल्य जगजाहीर आहे. त्यांनी यापूर्वी भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये दोन संघाबरोबर काम केले आहे आणि त्यांना आयपीएलचा खूप अनुभव आहे,'' असे मत पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी व्यक्त केले आहे. 

पंजाबने आपला सपोर्ट स्टाफ नेमला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू जॉर्ज बेली हा फलंदाजीचा प्रशिक्षक असेल तर सुनील जोशी सहाय्यक प्रशिक्षक असतील. 


​ ​

संबंधित बातम्या