अनिकेत जाधवचा 'तो' गोल सोशल मिडीयावर गाजतोय
विशेष म्हणजे हा सामना जमशेदपूर फुटबॉल क्लबने जिंकला. सामनावीरचा मान अनिकेतला मिळाला. त्याचा व्हिडिओ व्हॉट्सऍपद्वारे शेअर केला जात आहे. अनिकेतच्या या गोलची नोंद घेवून त्याचे तोंड भरून कौतुकही केले जात आहे.
कोल्हापूर - आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव याने जमशेदपूरच्या मैदानावर केलेला गोल कोल्हापुरात अक्षरशः गाजत आहे. सोशल मीडियावर गोलचा व्हिडीओ फिरत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डाव्या पायाने केलेला गोल फुटबॉलप्रेमींच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.
इंडियन सुपर लीग स्पर्धा जमशेदपूरमध्ये सुरू आहे. स्पर्धेत जमशेदपूर फुटबॉल क्लब विरूद्ध हैदराबाद फुटबॉल क्लब यांच्यातील सामना 1-1 ने बरोबरीत होता. जमशेदपूर फुटबॉल क्लबच्या खेळाडूंकडून् जिद्दीने खेळ सुरू होता. उत्तरार्धात अनिकेतने डाव्या बगलेतून मिळालेल्या पासवर डाव्या पायाने अफलातून गोल केला.
विशेष म्हणजे हा सामना जमशेदपूर फुटबॉल क्लबने जिंकला. सामनावीरचा मान अनिकेतला मिळाला. त्याचा व्हिडिओ व्हॉट्सऍपद्वारे शेअर केला जात आहे. अनिकेतच्या या गोलची नोंद घेवून त्याचे तोंड भरून कौतुकही केले जात आहे.
प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा कैलास पाटील डाव्या पायाने फुटबॉल खेळण्यात वाकबगार आहे. दिलबहार तालीम मंडळाचा सचिन पाटील मोक्याच्या क्षणी डाव्या पायाने गोल करण्यात कधी कमी पडला नाही. अनिकेतही दोन्ही पायांनी खेळण्यात निष्णात आहे. त्याची झलक त्याने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दाखवली.