ब्रिट्स टेनिस स्पर्धेतून अँडी मरेची माघार 

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरेने ब्रिट्स प्रदर्शन स्पर्धेतील तिसर्‍या स्थानावरील प्लेऑफ सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरेने ब्रिट्स प्रदर्शन स्पर्धेतील तिसर्‍या स्थानावरील प्लेऑफ सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. लॉन टेनिस एसोसिएशन (एलटीए) ने यादर्भात काल रविवारी आपल्या संकेतस्थळावर निवेदन प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे. एलटीएने आपल्या प्रसिद्धी पत्रकात, कॅमेरून नॉरी विरुद्ध होणाऱ्या तिसर्‍या स्थानावरील प्लेऑफ सामन्यातून अँडी मरेने माघार घेतली आहे. आणि त्यामुळे अँडी मरेची जागा जेम्स वार्ड घेणार असल्याचे एलटीएने म्हटले आहे.  

मास्टर ब्लास्टरची विकेट घेतल्यामुळे 'या' खेळाडूला मिळाले होते गिफ्ट            

एकेकाळी जागतिक टेनिसच्या पहिल्या क्रमांकावर असणारा अँडी मरे मागील सात महिन्यांपासून दुखापतग्रस्त असल्याने टेनिसपासून दूर होता. मात्र त्यानंतर 
ब्रिट्स प्रदर्शन चॅरिटी स्पर्धेतून त्याने टेनिसमध्ये पुनरागमन केले होते. अँडी मरेचा भाऊ जेमी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अँडी मरेचा सामना तिसर्‍या स्थानावरील प्लेऑफ साठी कॅमेरून नॉरीसोबत होणार होता. शनिवारी २७ तारखेला झालेल्या सेमीफायनल मध्ये अँडी मरेला डॅन इव्हान्सकडून पराभव पत्करावा लागला होता.

वर्णद्वेषासाठी सुद्धा मॅच फिक्सिंग किंवा डोपिंग सारखीच शिक्षा असावी - जेसन होल्डर          

दुखापतीवर मात करत टेनिसमध्ये पुनरागमन केल्यानंतर 33 वर्षीय अँडी मरेने गेल्या पाच दिवसांत चार सामने खेळले आहेत. यामध्ये अँडी मरेने लियाम ब्रॉडी आणि वॉर्डचा पराभव केला होता. काही दिवसांपूर्वी अँडी मरेने, नोवाक जोकोविचच्या ऍंड्रिया टूरने सोशल डिस्टंसिन्गचे काटेकोर पालन केले नसल्यामुळे टेनिसला बदनाम केले असल्याचे म्हटले होते. ऍंड्रिया टूरच्या दरम्यान जागतिक अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचसह अन्य खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर विविध स्तरातून नोवाक जोकोविचवर ऍंड्रिया टूर स्पर्धेच्या आयोजनावरून टीका होत आहे.                

 


​ ​

संबंधित बातम्या