यू.एस ओपन मधून अजूनही काही खेळाडू माघार घेण्याची शक्यता - अ‍ॅन्डी मरे

टीम ई-सकाळ
Saturday, 1 August 2020

कोरोना साथीच्या धोक्याचा विचार करून इतर खेळाडू देखील यू.एस ओपन मधून माघार घेण्याची शक्यता असल्याचे ब्रिटनचा खेळाडू माजी ऑलिम्पिक चॅम्पियन आणि तीन वेळा ग्रँड स्लॅम विजेता अ‍ॅन्डी मरेने म्हटले आहे. 

जगातील पहिल्या क्रमांकाची महिला टेनिसपटू एश्लीग बार्टीने यू.एस ओपन मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता कोरोना साथीच्या धोक्याचा विचार करून इतर खेळाडू देखील यू.एस ओपन मधून माघार घेण्याची शक्यता असल्याचे ब्रिटनचा खेळाडू माजी ऑलिम्पिक चॅम्पियन आणि तीन वेळा ग्रँड स्लॅम विजेता अ‍ॅन्डी मरेने म्हटले आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

ऑस्ट्रेलियाची जगातील अव्वल टेनिसपटू एश्लीग बार्टी हिने आगामी यू.एस. ओपन स्पर्धेत सहभाग न घेण्याचा निर्णय गुरुवारी 30 जुलै रोजी जाहीर केला होता.  कोरोना साथीच्या काळात प्रवास करण्याची जोखीम असल्याचे कारण एश्लीग बार्टीने दिले होते. व वेस्टर्न अँड सदर्न ओपन आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत खेळणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर अ‍ॅन्डी मरेने कोरोनाच्या साथीमुळे अजूनही काही खेळाडू यू.एस ओपन स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. अ‍ॅन्डी मरेने माध्यमांशी संवाद साधताना, '' काही अव्वल पुरुष खेळाडू यू. एस ओपनमध्ये खेळणार नसल्याचे समजते आणि यामागील कारण कोरोना असू शकते. त्यामुळे खेळणे किंवा न खेळणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र जर त्यांना सुरक्षित वाटत नसेल आणि प्रवास करुन स्वत: ला आणि त्यांच्या टीमला धोका पत्करायचा नसेल तर हे समजू शकते,'' असे म्हटले आहे. 

कोरोना विषाणूच्या संकटामुळे टेनिसमधील विम्बल्डनने यंदाची स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तर फ्रेंच ओपन पुढे ढकलण्यात आली असून,  27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर च्या दरम्यान घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तसेच यू.एस. ओपन 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा नोवाक जोकोविच व दुसऱ्या स्थानावर असलेला राफेल नदाल आणि अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स यंदाच्या  यू.एस. ओपन स्पर्धेत सहभागी होणार आहे. याशिवाय अमेरिकन टेनिस असोसिएशनने या दोन्ही स्पर्धेसाठी जैव-सुरक्षित वातावरण तयार करणार असल्याचे म्हटले आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

दरम्यान, अमेरिकेत 45 लाख 63 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, 1 लाख 53 हजार 378 जणांचा जीव गेला आहे. तर संपूर्ण जगभरात आत्तापर्यंत 1,76,13,859 नागरिकांना  कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. आणि 6 लाख 79 हजार 986 जणांचा मृत्यू झालेला आहे.


​ ​

संबंधित बातम्या