#वर्णभेदाचा_खेळ : 'त्या' प्रकरणानंतर म्हणे सायमंड नशेच्या आहारी गेला

टीम ई-सकाळ
Saturday, 6 June 2020

2008 मध्ये सिडनी कसोटीत टर्मिनेटर हरभजन सिंग आणि अँड्र् सायमंड यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. हा वाद चांगलाच गाजलाही होता.

#वर्णभेदाचा_खेळ या लेखमालिकेत इंग्लंडकडून खेळणाऱ्या जोफ्रा आर्चर मैदानात ओढावलेल्या भेदभावाच्या कृत्यानंतर आपण भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू आणि ऑस्ट्रेलियन संघातील दमदार खेळाडू यांच्यात झालेल्या वादग्रस्त मुद्यावर नजर टाकणार आहोत. 2008 मध्ये सिडनी कसोटीत टर्मिनेटर हरभजन सिंग आणि अँड्र् सायमंड यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. भज्जीने दिसण्यावरुन टिपण्णी केल्याचा आरोप सायमंडने केला होता. क्रिकेटच्या मैदानातील हा वाद चांगलाच गाजला होता. 

# वर्णभेदाचा_खेळ : साहेबांच्या ताफ्यातील हा प्रतिभावंत खेळाडूही दुखावलाय

कमालीच्या कामगिरीसह रागीट स्‍वभावामुळेसुध्‍दा चर्चेत राहणारा भारतीय खेळाडू कोण? असा प्रश्न विचारला तर हरभजनचे नाव या यादीत निश्चितच येईल. सिडनीच्या मैदानात  भज्जीने वर्णभेदावरुन टिपण्णी केल्याचा आरोप सायमंडने केला. या आरोपानंतर भज्जीला तीन सामन्यावर बंदी घालण्यात आली होती. भारताने दौऱ्या अर्ध्यावर सोडून जाण्याची धमकी दिल्यानंतर भज्जीवरील बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला होता. भज्जीने आपल्याला 'मंकी' म्हटले असे सायमंडने म्हटले होते. या वादात भज्जी विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा पूर्ण ताफा असे चित्र पाहायला मिळाले.

अखेर जातीवाचक टिप्पणी केल्याबद्दल युवराजने माफी मागीतली

मैदानात नेमका काय प्रकार घडला? हरभजन खरंच दोषी आहे का? यासंदर्भात रेफ्रींनी या प्रकारावेळी मैदानात असलेल्या सचिन तेंडुलकरचीही साक्ष घेतली होती. यावेळी सचिनने भज्जीची बाजू घेतली होती. सचिनने दिलेला कौल भज्जीसाठी अनुकूल ठरला. अन् हरभजनसमोर अख्खी ऑस्ट्रेलियन टिम पराभूत झाली. भज्जी या प्रकरणातून निर्दोष सुटला. 
या प्रकरणावर खुद्द भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही एका कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले होते. भज्जी सायमंडला उद्देशून मंकी वैगेरे म्हटला नव्हता असे गांगुलीने सांगितले होते. यावर भज्जीने नेमका प्रकार काय झाला हे याच कार्यक्रमात स्पष्ट केले होते. मला इंग्रजी येत नाही. मी मॉ की...असं म्हटलो होते. सायमंडला तो उच्चार मंकी असा वाटला, असे स्पष्टीकरण हरभजनने दिले होते. 

...म्हणून मेस्सीचं 'विलगीकरण' प्रॅक्टिस

सिडनीच्या मैदानातील वादामुळे करिअर उद्धवस्त झाले अशी भावना सायमंडने व्यक्त केली होती. या प्रकरणात मी माझ्या सहकाऱ्यांना आणायला नको होते, अशी प्रतिक्रियाही त्याने दिली होती. 2008 मध्ये हे प्रकरण घडल्यानंतर सायमंड नैराश्यामुळे अधिक अल्कोहलचे सेवन करु लागल्याची चर्चाही रंगली होती. 2009 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेवेळी संघासोबत असताना नशा केल्याच्या  कारणावरुन त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा प्रकारही घडला. त्यानंतर त्याची  कारकिर्दच संपुष्टात आली. हरभजनसोबतच्या प्रकरणामुळे कारकिर्द लवकर संपली, अशी भावनाही सायमंडने बोलून दाखवली होती.


​ ​

संबंधित बातम्या