हेल्मेटवर चेंडू आदळल्याने आंद्रे रसेल स्ट्रेचरवरुन थेट रुग्णालयात 

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

क्रिकेटच्या मैदानावर उसळते चेंडू आदळून होणाऱ्या दुखापती काही केल्या थांबेनात. स्टिव्ह स्मिथ पाठोपाठ वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलच्या डोक्यावर वेगाने चेंडू आदळला. हा आघात एवढा जबरदस्त होता की तो मैदानावरच पडला आणि त्याला स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्यात आले. 

जमैका : क्रिकेटच्या मैदानावर उसळते चेंडू आदळून होणाऱ्या दुखापती काही केल्या थांबेनात. स्टिव्ह स्मिथ पाठोपाठ वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलच्या डोक्यावर वेगाने चेंडू आदळला. हा आघात एवढा जबरदस्त होता की तो मैदानावरच पडला आणि त्याला स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्यात आले. 

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये रसेल जमैका थलावाज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. सेंट ल्युसिया झौक्स संघाविरुद्धच्या सामन्यात ही घटना घडली. सामन्याच्या 14 व्या षटकात झौक्स संघाचा वेगवान गोलंदाज हार्डस विलजोनचा बाऊंसर रसेलच्या डोक्यावर जोरात आदळला.

त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे स्कॅनिंकही करण्यात आले. त्यानंतर त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

 


​ ​

संबंधित बातम्या