अख्खा देश ज्यांचा करतोय तिरस्कार त्यांच्याच खेळाडूविरुद्ध आनंदची हार

संजय घारपुरे
Wednesday, 29 July 2020

माजी जगज्जेता विश्‍वनाथन आनंदला पुन्हा लिजंडस्‌ ऑफ चेस स्पर्धेत पराभव पत्करावा लागला.

मुंबई : माजी जगज्जेता विश्‍वनाथन आनंदला पुन्हा लिजंडस्‌ ऑफ चेस स्पर्धेत पराभव पत्करावा लागला. सातव्या फेरीत विजय मिळवून अखेर पराभवाची मालिका खंडीत केलेला आनंद आठव्या फेरीतील दोन डावांत पांढरी मोहरे असताना एकतर्फी पराजित झाला. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

आनंदने सातव्या फेरीत एक डाव शिल्लक ठेवून विजय मिळवला होता, पण त्याला आठव्या फेरीत डिंग लिरेनविरुद्ध अखेरचा चौथा डाव खेळण्यापूर्वीच 0.5-2.5 पराभवास सामोरे जावे लागले होते. चीनच्या अव्वल प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आनंदने दुसऱ्या डावात काळी मोहरे असताना विजयाची संधी दवडली आणि त्याचा त्याला फटका बसला. 

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात  

आनंदने सातव्या फेरीत विजय मिळवताना त्याचा जुना फॉर्म दाखवला होता, तर डिंगची या स्पर्धेत कामगिरी खालावलेली आहे, त्यामुळे आनंदच्या विजयाची अपेक्षा सर्वांना होती. सिसिलियन पद्धतीने हुशारीने चाली करताना डिंगने आनंदला पांढरी मोहरे असल्याचा फायदाच घेऊ दिला नाही. पहिल्या डावात कॅसल करण्याची आनंदची वेळ चुकली आणि त्याला 22 चालीतच हार पत्करावी लागली. तिसऱ्या डावात मोक्‍याच्यावेळी आनंदने डिंगला आक्रमणाची चांगली संधीच निर्माण करून दिली. त्यामुळे तो 39 चालीत पराजित झाला. दुसऱ्या डावात आनंदची बाजू वरचढ होती, पण त्याचे विजयात रूपांतर करणे त्याला जमले नाही.


​ ​

संबंधित बातम्या