आठ लढती गमावल्याने लिजंडस्‌ ऑफ चेस स्पर्धेत आनंद 'या' स्थानावर

संजय घारपुरे
Thursday, 30 July 2020

माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला लिजंडस्‌ ऑफ चेस स्पर्धेत आठव्या पराभवास सामोरे जावे लागले.

मुबई : माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला लिजंडस्‌ ऑफ चेस स्पर्धेत आठव्या पराभवास सामोरे जावे लागले. या स्पर्धेतील प्राथमिक नऊ फेऱ्यांत आनंदने एकच विजय मिळवला आणि त्याला तळाचे स्थान टाळल्याचेच समाधान लाभले. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

आनंद अखेरच्या फेरीत त्याचा पारंपारीक प्रतिस्पर्धी वासीली इवानचूकविरुद्ध अखेरच्या फेरीत पराजित झाला. या लढतीतील चार डावही बरोबरीत सुटल्यावर आनंदने आर्मगेदॉन डाव गमावला. या स्पर्धेत आनंदने या प्रकाराचे चारही डाव गमावले. या प्रकारात वेगवान खेळ करणारा यशस्वी होतो, आनंदला नेमके हेच जमले नाही आणि त्याला 2-3 पराभवास सामोरे जावे लागले. 

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात    

इवानचूक आणि आनंद यांच्यातील पहिली लढत 1985 च्या जागतिक कुमार स्पर्धेत झाली होती. चेस ऑफ लिजंडस्‌मधील लढत नक्कीच संस्मरणीय नव्हती. आर्मगेदॉन डावात पांढरी मोहरे असलेल्या आनंदने सुरुवातीस प्यादे जिंकत छान सुरुवात केली. त्याचा खेळ इवानचूकपेक्षा जास्त वेगवानही होता. पांढरी मोहरे असल्याने आनंदला विजयच हवा होता, तर इवानचूकला बरोबरी पुरेशी होती. इवानचूकची बरोबरीची योजना हाणून पाडण्यात आनंद अपयशी ठरला. त्यामुळे स्पर्धेत पाचव्या आलेल्या इवानचूकने आनंदच्या दुप्पट बक्षिस जिंकले. आनंद चीनच्या डिंग लिेरेनपाठोपाठ नववा आला.


​ ​

संबंधित बातम्या