Asian Games 2018 : अमित पांघलचा सुवर्ण पंच

वृत्तसंस्था
Saturday, 1 September 2018

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या लाईट फ्लाय प्रकारात 49 वजनी गटात भारताचा बॉक्सर अमित पांघलने सुवर्ण पदक पटकावले. 

जकार्ता : इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या लाईट फ्लाय प्रकारात 49 वजनी गटात भारताचा बॉक्सर अमित पांघलने सुवर्ण पदक पटकावले. 

अमितने ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या उजबेकिस्तानच्या हसनबोय दुस्मातोव्हचा 3-2 पराभव केला. हे 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगमधील भारताचे पहिले सुवर्णपदक आहे. 2010च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या विकास कृष्णनला दुखापतीमुळे उपांत्य फेरीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळेच त्याला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. 

49 किलो गटात अंतिम लढतीत सुरवातीला दोन्ही खेळाडूंनी सावध खेळ केला. अमितने सुरेख बचाव करताना उजबेकिस्तानच्या खेळाडूला गुण मिळवण्यापासून रोखले. अमितनेन 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. हरियानाच्या अमितने 2017 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते.


​ ​

संबंधित बातम्या