IPL 2019 : विश्वकरंडकासाठी रायुडू सोडा आता युवराजचाच विचार करावा की काय

टीम ई सकाळ
Wednesday, 3 April 2019

आयपीएल 2019 : मुंबई : आयपीएलच्या गेल्या मोसमात अंबाती रायुडूने चेन्नई सुपर किंग्जकडून 16 सामन्यांमध्ये 602 धावा केल्या होत्या. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला भारतीय संघाचे दार उघडे झाले. दरम्यानच्या काळात एकदिवसीय संघात त्याने आपली जागा निश्चित केली खरी मात्र, त्याच्या कामगिरी सातत्याचा अभाव आहे. विश्वकरंडकासाठी निवडण्यात येणाऱ्या संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची तोच प्रमुख दावेदार मानला जात असला तरी यंदाच्या आयपीएलमधील त्याची कामगिरी पाहता निवड समिती फेरविचार करण्याची शक्यता आहे. 

गेल्या मोसमात रायुडूने 149.75च्या सरासरीने 53 चौकार आणि 34 षटकार मारत 602 धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. त्याने गेल्या मोसमात चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणार खेळाडू ठरला होता.  यंदाच्या मोसमात मात्र त्याला चार सामन्यात केवळ 34 धावा करता आल्या आहेत. त्यामध्ये त्याने केवळ तीन चौकार आणि एक षटकार मारला आहे. 

प्रत्येक सामन्यात तो दडपणाखाली खेळत आहे आणि चुकीचे फटके मारुन बाद होता आहे. विश्वकरंडकात जागा पक्की करायची असेल तर आयपीएलमध्ये कामगिरी करणे गरजेचे आहे. एकीकडे रिषभ पंत, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक वेगाने चांगली कामगिरी करत आहेत तर दुसरीकडे याच दडपणाखाली रायुडूचा खेळ खालावत चालला आहे. त्यामुळेच आता तर त्याला यंदाच्या मोसमात कामगिरी करता आली नाही तर कदाटित त्याच्या जागी अजिंक्य रहाणेचा विचार केला जाऊ शकतो.

​ ​

संबंधित बातम्या