Wimbledon 2019 : बार्टीच्या पार्टीचा अॅलिसनमुळे बेरंग

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍ली बार्टीचे विंबल्डनच्या महिला एकेरीतील आव्हान चौथ्या फेरीत आटोपले. जागतिक क्रमवारीत 55व्या स्थानावर असलेल्या ऍलिसन रिस्कने तिला 3-6, 6-2, 6-3 असा धक्का दिला. 

वर्ल्ड कप 2019 : विंबल्डन : अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍ली बार्टीचे विंबल्डनच्या महिला एकेरीतील आव्हान चौथ्या फेरीत आटोपले. जागतिक क्रमवारीत 55व्या स्थानावर असलेल्या ऍलिसन रिस्कने तिला 3-6, 6-2, 6-3 असा धक्का दिला. 

ऍलीसनने एक तास 36 मिनिटांत पिछाडीवरून सामना जिंकताना चमकदार खेळ केला. 23 वर्षीय बार्टीने आधीच्या सामन्यांत एकही सेट गमावला नव्हता. फ्रेंच विजेतेपदानंतर या स्पर्धेत तिची संभाव्य विजेती अशी गणना होत होती, पण तिला लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही.

ऍलिसन 29 वर्षांची आहे. ती म्हणाली की, "माझ्यासाठी ही कामगिरी किती मोलाची आहे याविषयी बोलण्याची सुरवात कशी करायची हेच मला कळत नाही. अशा सामन्यांत आव्हानावर मात करणे ज्या पद्धतीने शक्‍य झाले त्यामुळे मी जास्त रोमांचित झाले आहे. ग्रास कोर्टवर माझा खेळ बहरतो. आता इतर ठिकाणी सुद्धा असे घडावे अशी माझी आशा आहे.'

बार्टीने सुरवात चांगली केली. या दोघींत यापूर्वी 2016 मध्ये झालेली एकच लढत ऍलिसनने जिंकली होती. त्यापासून ऍलिसनने प्रेरणा घेत पिछाडी भरून काढली. निर्णायक सेटमध्ये तिने 4-3 अशा स्थितीस ब्रेक मिळविला.


​ ​

संबंधित बातम्या