महाराष्ट्र केसरी घडविणारे गामा पैलवान काळाच्या पडद्याआड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 October 2019

आष्टी तालुक्याची नव्हे तर बीड जिल्ह्याला मातीच्या कूस्तीच्या माध्यमातून एका विशिष्ट पटलावर घेऊन जाणारे तसेच चिरंजीव सईद चाऊस सारखा महाराष्ट्र केसरी,उप हिंदकेसरी,तीन वेळा उप महाराष्ट्र केसरी असा मल्ल महाराष्ट्राला देणारे आष्टीचे भूषण देशाचे गामा पुरस्कार प्राप्त पै.अलीबीन चाऊस वय वर्षे 78 यांचे बुधवारी पहाटे दुःखद निधन झाले.

आष्टी : आष्टी तालुक्याची नव्हे तर बीड जिल्ह्याला मातीच्या कूस्तीच्या माध्यमातून एका विशिष्ट पटलावर घेऊन जाणारे तसेच चिरंजीव सईद चाऊस सारखा महाराष्ट्र केसरी,उप हिंदकेसरी,तीन वेळा उप महाराष्ट्र केसरी असा मल्ल महाराष्ट्राला देणारे आष्टीचे भूषण देशाचे गामा पुरस्कार प्राप्त पै.अलीबीन चाऊस वय वर्षे 78 यांचे बुधवारी पहाटे दुःखद निधन झाले.

माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई आणि तत्कालीन कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पै.अलीबीन चाऊस यांची निवड केलेली होती माञ अपरिहार्य कारणास्तव ते जाऊ शकले नाहीत.तसेच हिंदकेसरी दिल्लीचे पै.चंदिराम,हिंद केसरी पै.दिनानाथ सिंग,पै.अमरसिंह,पै.चंबा मुतनाळ,पै.नारायण हंगे,यांच्यासह अनेक देशातील मातब्बर कुस्तीगीरांबरोबर आष्टी सारख्या ठिकाणी राहून कुस्त्या खेळणारे ते मल्ल होते. त्यामुळे पै.अलीची आष्टी अशी एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.पै.चाऊस यांनी महाराष्ट्राला सुवर्ण पदक देखील मिळवून देत पाकिस्तानी मल्लांनाही त्यांनी आस्मान दाखविले.

तालुक्यातील मंगरुळ सारख्यां ग्रामीण भागातून कॉमनवेल्थ मध्ये देशाला रौप्यपदक मिळवून देणा-या सोनाली तोडकर या मुलीचे ते मार्गदर्शक होते.तर जागतिक कुस्तीपटू असलेला राहूल आवारे यांचे वडील बाबासाहेब आवारे यांना मार्गदर्शक म्हणून होते.तसेच पै.अक्षय गायकवाड हा कास्य पदक पटकाविणारा मल्ल.पै.प्रमोद चौधरी पै.बालाजी जरे पै.बाबासाहेब आंधळे पै.नवनाथ भगत पै.जमीर पठाण पै.बबन माने पै.अस्लम पठाण हे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी करणारे मल्ल यांचे ते गुरु होते.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब आजबे,माजी जि.प.सदस्य देविदास धस,विजय गोल्हार,उद्धव दरेकर, शिवाजी राऊत,प्रा.अनंत हंबर्डे, मधूकर हंबर्डे,रमजान तांबोळी,सतिश शिंदे,अजय धोंडे,ह.भ.प.आदीनाथ आंधळे,पै.लहू गाडे,पै.बाळासाहेब आवारे, हनुमंत थोरवे,बाबासेठ,मन्सुर शेख,गुलशनवाला बंधू,नियामत बेग, सय्यद ताहेर, संजय मेहेर, सुखलाल मुथा, विलास सोनवणे, अनिल ढोबळे, संजय ढोबळे, रविंद्र ढोबळे, संजय ढोबळे, जुबेर चाऊस, विजय मेहेर, सुनील मेहेर, संजय शिंगवी, बबन औटे, राजेंद्र बोंदार्डे, सुरेश शिंदे, सतिश जोशी, संतोष तांबे, भारत मुरकुटे, शरीफ शेख, संतोष मुरकुटे, मनोज सुरवसे, नविन कासवा, नवनीत गुंदेचा, गिरिष देशपांडे, पिनू दहिवाळ, सुनील मिरचंदाणी, सुनील रेडेकर, जिया बेग, सय्यद तय्यब, सय्यद शफी, सादिक कुरेशी, अरुन निकाळजे, मतीन शेख, अतुल मुळे, राजू टेकाडे, अजहर बेग, सय्यद अन्वर अली, रामभाऊ कदम, कल्पेश मेहेर, प्रितम बोगावर, राहूल शिंदवी, योगेश कासवा, अक्षय हळपावत, योगेश कासवा, शितल मुथा, पञकार शरद रेडेकर, सचिन रानडे यांच्यासह आष्टी, अहमदनगर, पुणे, मालेगाव, औरंगाबाद, जालना, जामखेड, हैद्राबाद, परभणी, बीड, माजलगाव यासह आदी विविध शहरासह ग्रामीण भागातील व्यापारी,शेतकरी,कुस्तीपटू,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. अलीबीन चाऊस यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे.


​ ​

संबंधित बातम्या