जागतिक मैदानी स्पर्धा : प्रशिक्षक अल्बर्तो सालाझार यांच्यावर बंदी

नरेश शेळके
Wednesday, 2 October 2019

डोपींगमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध अॅथलेटिक्स प्रशिक्षक 61 वर्षीय अल्बर्तो सालाझार यांच्यावर अमेरिकन उत्तेजक विरोधी संस्थेने चार वर्षाची बंदी टाकली आहे. याविषयी आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाला कळविण्यात आल्यानंतर सालाझार यांचे जागतिक मैदानी स्पर्धेसाठीचे अधिकृत कार्ड काढून घेण्यात आले आहे.

दोहा : डोपींगमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध अॅथलेटिक्स प्रशिक्षक 61 वर्षीय अल्बर्तो सालाझार यांच्यावर अमेरिकन उत्तेजक विरोधी संस्थेने चार वर्षाची बंदी टाकली आहे. याविषयी आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाला कळविण्यात आल्यानंतर सालाझार यांचे जागतिक मैदानी स्पर्धेसाठीचे अधिकृत कार्ड काढून घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सालाझार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या खेळाडूंनी त्यांच्याशी संपर्क करू नये असे महासंघाने म्हटले आहे.

जन्माने क्युबाचे असलेले सालाझार उमेदीच्या काळात प्रसिद्ध मॅरेथॉनपटू होते.  ते अमेरिकेतील ओरेगॉन येथील नाईके प्रोजेक्टमध्ये खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात. त्याचे सात खेळाडू जागतिक मैदानी स्पर्धेत भाग घेत असून आतापर्यंत त्यापैकी सिफान हसन (नेदरलँड-महिला दहा हजार मीटर) आणि पुरुषांच्या आठशे मीटरमध्ये डोनाव्हन ब्रेझीयरने सुवर्णपदक जिंकले आहे. ते मो फराह यांचेही प्रशिक्षक होते. मात्र, 2017 मध्ये फराहने सालाझार यांच्यापासून फारकत घेतली होती.  

याविषयी आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सॅबेस्टीयन को म्हणाले, खेळाडूंनी सालाझार यांच्यासोबतचे सर्व संबंध तत्काळ तोडावे आणि डोपींग प्रकरणात माहिती देण्यासाठी पुढे यावे. सालाझार यांच्यासोबत या प्रकल्पातील डॉक्टर जेफ्री ब्राऊन यांच्यावरही चा्र वर्षाची बंदी टाकण्यात आली आहे. या निर्णयाविरुद्ध आपण अपील करणार असल्याची माहिती सालाझार यांनी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर दिली. 


​ ​

संबंधित बातम्या