अॅलिस्टर कुकचे अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही शतक

वृत्तसंस्था
Monday, 10 September 2018

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने शानदार शतक झळकावले आहे. 

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने शानदार शतक झळकावले आहे. 

अॅलिस्टर कुकने 2006 मध्ये भारताविरुद्ध नागपूरमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यातही शतक झळकावले होते. त्यावेळी त्याने भारताविरुद्धच 104 धावांची नाबाद खेळी केली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या सामन्यातही उपहारापर्यंत त्याच्या नावावर नाबाद 103 धावा आहेत. कारकिर्दीतील पहिल्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो क्रीडा विश्वातील अवघा पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचे माजी कर्णधार महंमद अझरुद्दिन,  ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज ग्रेग चॅपेल, रेग्नाल्ड डफ आणि व्हिल्यम पॉनफोर्ड यांनी ही कामगिरी केली आहे. 

फलंदाज सामने सर्वाधिक धावा पहिला सामना अखेरचा सामना शतके
महंमद अझरुद्दिन 99 147 110 102 22
ग्रेग चॅपेल 87 247 108 182 24
रेग्नाल्ड डफ 22 146 104 146 2
व्हिल्यम पॉनफोर्ड 29 266 110 266 7

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात इंग्लंडने उपहारापर्यंत दोन बाद 243 धावा केल्या आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या