वॉर्नरवर पुन्हा चेंडू कुरतडल्याचा आरोप

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर पुन्हा एकदा चेंडू कुरतडण्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी हा आरोप आणखी कोणी नाही तर इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने केला आहे. 

मॅंचेस्टर : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर पुन्हा एकदा चेंडू कुरतडण्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी हा आरोप आणखी कोणी नाही तर इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने केला आहे. 

अन् पंड्या बंधूंची झाली सगळ्यांसमोरचं भांडणं!

वॉर्नर चेंडूबरोबर कशी छेडछाड करायचा, हेदेखील त्याने सांगितले आहे. वॉर्नरने स्वत:च तो चेंडू कसा कुरतडायचा हे सांगितल्याचा खुलासा कूकने यावेळी केला आहे. 

कुकने याबाबतचा एक किस्सा सांगतिला आहे. तो म्हणाला, " वॉर्नरने बीअर प्यायलावर चेंडूशी छेडछाड कशी केली हे मला सांगितले होते. स्थानिक सामन्यांमध्ये वॉर्नर हा दोन्ही हातांना पट्ट्या बांधायचा. या दोन्ही पट्ट्यांमध्ये तो धातूचा एक तुकडा ठेवायचा. वॉर्नर या पट्ट्यांवर चेंडू घासायचा आणि छेडछाड करायचा. मात्र, आम्हाला हे बोलताना पाहून स्टिव्ह स्मिथ आमच्याजवळ येऊन वॉर्नरला हे सारं सांगितल्याबद्दल ओरडू लागला. त्यानंतर आमचं बोलणं झालं नाही. 

भारतीय संघात स्थान मिळताच शुभमनने उलगडले हे गुपित

दक्षिण आफ्रिकेत वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर चेंडू कुरतडण्या प्रकरणी एक वर्षाची बंदी घालण्यात आली. त्यानंतर जोरदार पुनरागमन करत स्मिथने आयसीसी कसोटी क्रमवारील पहिले स्थाम कमावले. मात्र, बंदी संपवून परतल्यावर वॉर्नरला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. 
 


​ ​

संबंधित बातम्या