अक्षयकुमारला करायचायं हिमा दासच्या जीवनावर चित्रपट

वृत्तसंस्था
Monday, 30 July 2018

भारतीय सिनेसृष्टीचा 'खिलाडी' अक्षय कुमारने भारताची 'गोल्डन गर्ल' हिमा दासच्या जीवनावर चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अक्षय कुमार सध्या त्याच्या 'गोल्ड' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान उपस्थित एका कार्यक्रमात त्याने हि इच्छा व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली : भारतीय सिनेसृष्टीचा 'खिलाडी' अक्षय कुमारने भारताची 'गोल्डन गर्ल' हिमा दासच्या जीवनावर चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अक्षय कुमार सध्या त्याच्या 'गोल्ड' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान उपस्थित एका कार्यक्रमात त्याने हि इच्छा व्यक्त केली आहे. 

अक्षय म्हणाला, ''हिमा दास ट्रॅक रनर असल्याने मला तिच्यावर जीवनपट करायला आवडेल. भारतातील अत्यंत छोट्या गावातून येऊन ट्रॅक प्रकारात सुवर्ण पदक पटकावणे हे फार दुर्मिळ आहे.''  भारतामध्ये अशा खेळांसाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असे मत अक्षयने व्यक्त केले. तो म्हणाला, ''आजवर 'ट्रॅक' या खेळामध्ये भारत थोडा कमी पडला आहे. माझ्यामते या खेळाला प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. आणि मग आपण जगाला दाखवून देऊ की आम्हीही काही कमी नाही. म्हणूनच मला हिमाच्या जीवनावर चित्रपट करायला आवडेल.''

अक्षय कुमारने त्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आदिल हुसेनने त्याला एक छोटा सल्ला केला आहे. त्याने या सिनेमात आसाममधीलच एका मुलीला घ्यावे किंवा खुद्द हिमालाच तिचा रोल करण्यास सांगावे असे ट्विट केले आहे.

संबंधित बातम्या