आगामी टी-20 वर्ल्डकपला धोनीची उपस्थिती इतकी महत्त्वाची नाही ; वाचा कोण म्हणाले असे   

टीम ई-सकाळ
Wednesday, 12 August 2020

पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविना ही स्पर्धा खेळण्याची 'सवय' करण्याची गरज असल्याचे मत, भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे ऑस्ट्रेलियात नियोजित यावर्षीची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविना ही स्पर्धा खेळण्याची 'सवय' करण्याची गरज असल्याचे मत, भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने व्यक्त केले आहे. महेंद्रसिंग धोनी भारतासाठी खेळण्यास तयार नसल्याचे देखील आकाश चोप्राने म्हटले असून, याव्यतिरिक्त धोनीची उपस्थिती संघात 'तितकीशी महत्त्वाची' नसल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

इंग्लंडमध्ये 2019 ला झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर धोनी भारतीय संघातून दूर राहिलेला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियातील ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत धोनी खेळण्याची अपेक्षा होती. परंतु आता ही स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. पण 2021 मध्ये भारतात ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक नियोजित आहे. त्यामुळे देशातच होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी असला पाहिजे आणि त्याने खेळावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण याआधी धोनीला खेळायचे आहे का? या प्रश्नाचा विचार केल्यास, तो खेळू इच्छित नसल्याचे मत आकाश चोप्राने व्यक्त केले आहे. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...      

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब वाहिनीवर बोलताना, महेंद्रसिंग धोनी पुढील वर्षापर्यंत उपलब्ध असला तरी, 2021 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेबाबत विचार केल्यास यासाठी अजून एक वर्ष बाकी आहे. आणि त्यामुळे भारतीय संघाला त्याच्याशिवाय खेळण्याची सवय करण्याची गरज असल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे. तसेच 2021 टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत धोनी शिवाय मैदानात उतरण्याची सवय देखील होईल, असे आकाश चोप्राने यावेळेस सांगितले.  याव्यतिरिक्त, 2021 टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये धोनीची उपस्थिती इतकी महत्त्वाची नसल्याचे देखील आकाश चोप्राने म्हटले आहे. महेंद्रसिंग धोनी संघात नसल्यास भारत विश्वचषक जिंकूच शकणार नाही, असे काही नसल्याचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने नमूद केले आहे. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयसीसीने 2021 मधील टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी  रंगणार आहे. तर यंदाच्या अमिरातीत होणाऱ्या आयपीएल स्पर्धेमध्ये महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करणार आहे.      


​ ​

संबंधित बातम्या