अजित वाडेकर यांच्यांवर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

वृत्तसंस्था
Friday, 17 August 2018

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्यावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी (15 ऑगस्ट) रात्री दीर्घ आजाराने जसलोक रुग्णालयामध्ये वाडेकरांचे निधन झाले.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्यावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी (15 ऑगस्ट) रात्री दीर्घ आजाराने जसलोक रुग्णालयामध्ये वाडेकरांचे निधन झाले. आज सकाळी 10 वाजता वाडेकर यांचे पार्थिव वरळी सी फेस येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

वाडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेले वाडेकर हे पहिले क्रिकेटपटू आहेत.  सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीसह काही खेळाडूंनी निवसस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. वाडेकरांची 
कर्मभूमी असलेल्या शिवाजी पार्क जिमखान्यावर त्यांना मानवंदना देण्यात आली. तसेच माजू क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी जिमखान्याची कॅप देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या