धवन आणि राहुल संघात नेमकं करतात काय?

वृत्तसंस्था
Monday, 10 September 2018

लंडन : भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने भारतीय संघाच्या अपयशास सलामीच्या जोडीला कारणीभूत ठरविले आहे. त्याने शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यावर निशाणा साधत संघातील त्यांच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

एका वृत्तवाहिनाली दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, ''सलामीवीरांसाठी इंग्लंडमधील वातावरण नक्कीच अवघड होते मात्र आता पाच कसोटी सामने उलटून गेले आहेत. राहुल आणि धवन दोघांनाही पुरेश्या संधी देण्यात आल्या आहेत. भारताचा सलामीवीर मुरली विजयला तिसऱ्या सामन्यानंतर मायदेशी पाठवण्यात आले. मागील अनेक वर्षात विजयने भारतासाठी सलामीवीराची भूमिका चोख बजावली आहे. आता मात्र धवन आणि राहुल यांच्या संघातील स्थानावर विचार करण्याची गरज आहे.''

शिखर धवनने सात डावांमध्ये 23च्या सरासरीने 161 धावा केल्या आहेत तर राहुलने सर्व पाच सामन्यांमध्ये 16.68च्या सरासरीने अवघ्या 150 धावा केल्या आहेत. 

''धवन पुन्हा एकदा परदेश दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. तर राहुलने पाचही सामन्यात संधी देऊनही चांगली कामगिरी केलेली नाही,'' असे मत अजित आगरकरने व्यक्त केले. 

​ ​

संबंधित बातम्या