दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात मतभेद?

वृत्तसंस्था
Friday, 28 February 2020

क्राइस्टचर्च: भारत-न्युझीलंड यांच्यात होणारा दुसरा कसोटी सामना भारतासाठी महत्वाचा आहे. न्युझीलंडकडून 10 विकेटनी झालेल्या परभवानंतर भारतीय संघ क्लिन स्विप टाळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण शनिवारी क्राइस्टचर्च येथील हेगली ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या सामन्याआधी कोहली आणि रहाणे यांच्यातील वाद समोर आला आहे. 

पहिल्या कोसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराची संथ खेळी हा त्यांच्यातील वादाचा विषय बनला आहे. विराट कोहलीने वेलिंग्टन कसोटीमध्ये पुजाराच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पुजाराने दोन्ही डावांमध्ये मिळून अवघ्या 22 धावा केल्या होत्या, त्यातही दूसऱ्या डावात केलेल्या 11 धावांसाठी त्याने तब्बल 81 चेंडू घेतले होते. 

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने मात्र चेतेश्वर पुजाराची बाजू घेतली आहे. रहाणेने सांगितले की, पुजारा हा धावा करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.  न्यूझीलंडचे गोलंदाज ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी हे चांगली गोलंदाजी करत आहेत त्यामुळे पुजाराच्या खेळण्यावर टीका करणे योग्य नाही. भारताला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. पहिल्या कसोटी पराभवानंतर संघाचा कर्णधार कोहली याने फलंदाजाना आक्रमकपणे खेळण्याचा सल्ला दिला होता.

दोन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज चांगली कामगीरी दाखवू शकले नाहीत. विराट कोहली पहिल्या सामन्यात केवळ 02 आणि 19 धावा करु शकला होता.

​ ​

संबंधित बातम्या