विंडीज, पाकनंतर 'हा' संघ इंग्लंड दौर्‍यावर जाण्याची शक्यता 

टीम ई-सकाळ
Monday, 20 July 2020

कोरोनाच्या संकटानंतर इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचा संघ देखील मागील जून महिन्यात तीन कसोटी आणि तीन टी२० मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाला आहे.

कोरोनाच्या संकटानंतर इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचा संघ देखील मागील जून महिन्यात तीन कसोटी आणि तीन टी20 मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघ सुद्धा तीन टी20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी चार सप्टेंबरपासून इंग्लंड दौर्‍यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

या कारणामुळे इंग्लंडची सामन्यावर पकड मिळवण्याची मोठी संधी हुकली

 कोरोनाच्या अभूतपूर्व संकटानंतर सर्वच क्रीडा क्षेत्राप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यानंतर कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून अनेक उपाय योजना आखत 8 जुलै पासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेस सुरवात करण्यात आली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबर मधील 4, 6 आणि 8 तारखेला तीन टी20 व 10, 12 आणि 15 तारखेला तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याचा विचार करत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ खासगी विमानाने इंग्लंडकडे रवाना होईल आणि हे सर्व सहा नियोजित सामने मॅनचेस्टरमधील साऊथॅम्प्टन आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळले जाण्याची शक्यता आहे.  

भारतीय क्रिकेटरच्या 'किस' ची ही स्टोरी तुम्ही 'मिस'तर नाही ना केली  

ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने गेल्या आठवड्यात 26 खेळाडूंच्या प्राथमिक यादीची नावे दिली होती, ज्यातून या इंग्लंड दौऱ्यासाठी अंतिम संघ निवडला जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या राष्ट्रीय संघाचे प्रमुख बेन ऑलिव्हर यांनी याअगोदर, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना इंग्लंडमध्ये व मायदेशी परतल्यानंतर कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून घेण्यात येणाऱ्या निर्बंधांच्या आधारे या दौर्‍याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे, स्पष्ट केले होते. तर सध्या इंग्लंड मधील मॅनचेस्टर येथील साऊथॅम्प्टन आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे जैवसुरक्षित वातावरणात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामने खेळवण्यात येत असून, त्यानंतर याच ठिकाणी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात देखील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 


​ ​

संबंधित बातम्या