टी -20 मधील दोन सामने खेळल्यानंतर श्रीलंकेत स्पर्धाच रद्द  

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरातील  क्रिकेट सामने थांबवण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत काही देशांमध्ये टी-10 आणि टी -20 लीगद्वारे क्रिकेटच्या स्पर्धा सुरु करण्यात आल्या आहेत. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यामध्ये देखील पुढील महिन्यातील 8 जुलै पासून कसोटी मालिकेस सुरवात होणार आहे. तर काल सोमवारपासून  श्रीलंकेत यूव्हीए टी -20 प्रीमियर लीगची सुरुवात झाली. परंतु या स्पर्धेतील दोन सामने खेळल्यानंतर ही लीगच रद्द करण्यात आली आहे.

आता फॉर्म्युला वन गाड्यांचा आवाज पुन्हा घुमणार         

कोरोना काळानंतर जगातील अनेक देशांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरु करण्यात आले. श्रीलंकेत देखील यूव्हीए टी -20 प्रीमियर लीग कालपासून सुरवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये चार संघ पुढील आठवड्याभरासाठी खेळणार होते. मात्र ही आयोजित स्पर्धाच बेकायदेशीर असल्याने, पहिले दोन सामने झाल्यानंतर ही लीगच रद्द करण्यात आली. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाकडून या स्पर्धेसाठी कोणतीही मान्यता घेण्यात आली नव्हती. त्यामुळे यूव्हीए टी -20 प्रीमियर लीग मधील उर्वरित सामने रद्द करण्यात आले. पण यापूर्वी या लीगमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील तिलकरत्ने दिलशान, फरवेझ महरूफ, अजंता मेंडिस आणि शनाकासारखे दिग्गज खेळाडू खेळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र फरवेझ महरूफ या खेळाडूने आपण या लीग मध्ये खेळणार नसल्याचे जाहीर केले होते.  

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू माहिती आहेत का ?            

यापूर्वी देखील, श्रीलंकेत 25 जूनपासून पीडीसी टी-10 लीग सुरु होणार होती. पण या लीगलाही श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मान्यता दिली नव्हती. त्यामुळे ही स्पर्धा देखील रद्द करण्यात आली होती. तत्पूर्वी या टी-10 लीग मध्ये नुआन कुलसेकरा आणि अजंता मेंडिस हे श्रीलंका क्रिकेट संघातील खेळाडू सामील होणार असल्याचे सांगण्यात आले होते.    

चेंडूला चमकावण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणे गरजेचे - भुवनेश्वर कुमार     

कोरोनाच्या मोठ्या ब्रेक नंतर श्रीलंका क्रिकेट संघाने मैदानावर परतण्यासाठी यापूर्वीच तयारी सुरु केली आहे. श्रीलंकेचा क्रिकेट संघ गेल्या काही दिवसांपासून
 कँडी येथे सराव करीत आहे. तर श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने यापूर्वीच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) व आशिया चषक यांसारख्या स्पर्धा श्रीलंकेत आयोजित करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. याशिवाय दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत यांच्यासोबतच नुकतेच बांगलादेशने श्रीलंकेचा दौरा रद्द केला आहे.     
     
​ ​

संबंधित बातम्या