रैनाच्या 'कवर ड्राइव'वर PM मोदींनी केली 'मन की बात'

सुशांत जाधव
Friday, 21 August 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सुरेश रैनाला पाठवलेल्या पत्रामध्ये त्याच्या क्षेत्ररक्षणाचा खास उल्लेख केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर आता सुरेश रैनालाही खास पत्र लिहून  क्रिकेटमधील योगदानाबद्दल आभार मानले आहेत. रैनाची क्रिकेट कारकिर्द ही स्वत:च्या यशासाठी नव्हती तर देश आणि संघाच्या हिताची झलक दाखवून देणारी होती, अशा आशयासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रैनाचे कौतुक केले आहे. रैनाला लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रामध्ये लिहिलंय की, यंग असल्याकारणामुळे 15 ऑगस्ट दिवशी घेतलेला निर्णयाला निवृत्ती संबोधने योग्य ठरणार नाही. क्रिकेटमधील लक्षवेधी कामगिरीनंतर दुसऱ्या इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा! 

युएईला जाण्यासाठी रोहितची लेक समायरानं आपलीही बॅग भरली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सुरेश रैनाला पाठवलेल्या पत्रामध्ये त्याच्या क्षेत्ररक्षणाचा खास उल्लेख केलाय. याशिवाय 2011 च्या विश्वचषक स्पर्धेतील मॅचविनिंग खेळीच्या आठवणीलाही उजाळा दिला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात रैनाने अनेअप्रतिम झेल पकडले आहेत. केवळ फलंदाजीसाठीच नव्हे तर गोंलदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही स्तरावर रैनाने दाखवलेली कामगिरी भारतीय कधीच विसरणार नाहीत, असा उल्लेखही पत्रामध्ये करण्यात आलाय. रैनाचे मैदानातील क्षेत्ररक्षण प्रेरणादायी असेच होते. क्षेत्ररक्षणावेळी धावा वाचवून अनेक सामन्यात भारताला यश मिळवून देण्यात क्षेत्ररक्षणातील त्याची ऊर्जा महत्त्वपूर्ण ठरली, याबाबीवरही भर देण्यात आलाय.

'पत्रास कारण की...'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कॅप्टन कूलला पत्र!

2011 च्या विश्वचषकातील उप उपांत्यफेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध रैनाने दमदार खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे भाराताचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मोटेराच्या मैदानातील रैनाच्या खेळीच्या आठवणीलाही मोदींनी उजाळा दिला.  चाहते रैनाचा कवर ड्राइव मिस करतील, असेही मोदींनी या पत्रात म्हटले आहे. मोदींनी पत्राच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छावर रैनाने प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही मैदानात केलेल्या कामगिरीबद्दल चाहत्यांकडून होणारे कौतुक ही अभिमानाची गोष्ट असते. देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार, अशा शब्दांत रैनाने मोदींचे आभार मानले आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या