IPL 2020 : लिलावानंतरही 'या' संघाकडे शिल्लक राहिले कोट्यवधी रूपये!

टीम ई-सकाळ
Friday, 20 December 2019

बंगळूरकडे खेळाडूंसाठीचे सर्वाधिक 4 स्लॉट शिल्लक आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली आणि चेन्नईकडे 3, कोलकाताकडे 2, तर मुंबईकडे 1 स्लॉट शिल्लक आहे.

कोलकता : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी मोसमासाठीचा लिलाव गुरुवारी (ता.19) पार पडला. या लिलावात अनेक तरुण तसेच अनुभवी खेळाडूंवर बोली लावली गेली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय खेळाडूंपेक्षा परदेशी खेळाडूंनी या लिलावात 'भाव' खाल्ला, तर काही अनसोल्ड राहिले. यंदा पार पडलेल्या लिलावात काही टीम्सकडे अजून रक्कम शिल्लक राहिली. तर काही टीम्सचे खेळाडूंसाठी असणारी रिक्त जागा (स्लॉट) शिल्लक आहेत.  

- IPL 2020 : लिलावात मिळाले 7.75 कोटी; खेळाडू म्हणतोय, 'आनंद पोटात माझ्या माईना रं माईना'!

टीमकडे शिल्लक असलेली रक्कम आणि स्लॉट :-

1) मुंबई इंडियन्स  

लिलावात बोली लावलेले खेळाडू 
- ख्रिस लिन (2 कोटी), नेथन कुल्टर नाईल (8 कोटी), सौरभ तिवारी (50 लाख), मोहसिन खान (20 लाख), दिग्विजय देशमुख (20 लाख), बलवंत राय सिंग (20 लाख)

शिल्लक रक्कम - 1 कोटी 95 लाख

स्लॉट - 1 (भारतीय खेळाडू)

2) चेन्नई सुपर किंग्ज 

लिलावात बोली लावलेले खेळाडू 
- जोश हेझलवूड (2 कोटी), सॅम करन (5.50 कोटी), पियुष चावला (6.75 कोटी), आर. साई किशोर (20 लाख)

शिल्लक रक्कम - 15 लाख

स्लॉट - 3 (2 भारतीय आणि 1 परदेशी खेळाडू)

3) दिल्ली कॅपिटल्स 

लिलावात बोली लावलेले खेळाडू 
- शिमरॉन हेटमायर (7.75 कोटी), ऍलेक्स केरी (2.40 कोटी), ख्रिस वोक्स (1.50 कोटी), मोहित शर्मा (50 लाख), जेसन रॉय (1.50 कोटी), तुषार देशपांडे (20 लाख), ललित यादव (20 लाख), मार्कस स्टॉयनिस (4.8 कोटी)

शिल्लक रक्कम - 9 कोटी

स्लॉट - 3 भारतीय खेळाडू

- IPL 2020 : केकेआर सोडताच पियुष बोलला धोनीबाबत, लागू शकते चाहत्यांच्या जिव्हारी

4) कोलकता नाईट रायडर्स 

लिलावात बोली लावलेले खेळाडू 
- इयॉन मॉर्गन (5.20 कोटी), पॅट कमिन्स (15.50 कोटी), मनिमरण सिद्धार्थ (20 लाख), वरुण चर्कवर्ती (4 कोटी), राहुल त्रिपाठी (60 लाख), ख्रिस ग्रीन (20 लाख), प्रविण तांबे (20 लाख), निखिल नाईक (20 लाख), टॉम बॅटन (1 कोटी) 

शिल्लक रक्कम - 8 कोटी 50 लाख

स्लॉट - 2 भारतीय खेळाडू

5) सनरायझर्स हैदराबाद 

लिलावात बोली लावलेले खेळाडू 
- मिशेल मार्श (2 कोटी), प्रियम गर्ग (1.9 कोटी), विराट सिंह (1.9 कोटी), बी. संदिप (20 लाख), फेबियन अॅलेन (50 लाख), अब्दुल समाद (20 लाख), संजय यादव (20 लाख)

शिल्लक रक्कम - 10 कोटी 10 लाख

स्लॉट - 0

6) राजस्थान रॉयल्स 

लिलावात बोली लावलेले खेळाडू 
- रॉबिन उथप्पा (3 कोटी), डेव्हिड मिलर (75 लाख), कार्तिक त्यागी (1.30 कोटी), आकाश सिंह (20 लाख), अनुज रावत (80 लाख), जयदेव उनाडकट (3 कोटी), ओश्ने थॉमस (50 लाख), अनिरुद्ध जोशी (20 लाख), ऍण्ड्रयू टाय (1 कोटी), टॉम करन (1 कोटी)

शिल्लक रक्कम - 14 कोटी 75 लाख

स्लॉट - 0

7) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर 

लिलावात बोली लावलेले खेळाडू 
- ख्रिस मॉरिस (10 कोटी), ऍरॉन फिंच (4.40 कोटी), जोश फिलीपे (20 लाख), केन रिचर्डसन (4 कोटी), पवन देशपांडे (20 लाख), डेल स्टेन (2 कोटी), शाहबाझ अहमद (20 लाख), इसुरु उडाना (50 लाख) 

शिल्लक रक्कम - 6 कोटी 40 लाख

स्लॉट - 4 भारतीय खेळाडू

8) किंग्ज इलेव्हन पंजाब 

लिलावात बोली लावलेले खेळाडू 
- जेम्स निशाम (50 लाख), रवी बिश्नोई (2 कोटी), ईशान पोरेल (20 लाख), दीपक हुडा (50 लाख), शेल्डन कॉट्रेल (8.5 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (10.75 कोटी), ख्रिस जॉर्डन (3 कोटी), तजिंदर ढिल्लॉन (20 लाख), प्रभसिमरन सिंग (55 लाख)

शिल्लक रक्कम - 16 कोटी 50 लाख

स्लॉट - 0

- IPL 2020 : आयपीएलच्या लिलावात लक्षवेधी ठरलेली ती तरुणी आहे तरी कोण?

पंजाबकडे आहे सर्वाधिक शिल्लक रक्कम

बोली लावून आणि खेळाडूंचे स्लॉट भरल्यानंतरही किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक राहिली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला सर्वाधिक किंमत देऊन आपल्या ताफ्यात भरती केल्यानंतरही पंजाबकडे 16 कोटी 50 लाख रुपये रक्कम शिल्लक राहिली आहे. 

त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्सकडे 14 कोटी 75 लाख, सनरायझर्स हैदराबादकडे 10 कोटी 10 लाख, दिल्ली कॅपिटल्सकडे 9 कोटी, कोलकाता नाईट रायडर्सकडे 8 कोटी 50 लाख इतकी रक्कम शिल्लक आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडे 6 कोटी 40 लाख, तर मुंबई इंडियन्सकडे 1 कोटी 95 लाख रक्कम शिल्लक आहे. सर्वाधिक चाहते असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज या यादीत तळाशी आहे. चेन्नईकडे फक्त 15 लाख रुपये एवढीच रक्कम शिल्लक राहिली आहे. 

तसेच बंगळूरकडे खेळाडूंसाठीचे सर्वाधिक 4 स्लॉट शिल्लक आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली आणि चेन्नईकडे 3, कोलकाताकडे 2, तर मुंबईकडे 1 स्लॉट शिल्लक आहे. तर पंजाब, राजस्थान, हैदराबाद यांच्याकडील खेळाडूंसाठीचे स्लॉट पूर्ण भरले असून एकही स्लॉट शिल्लक राहिलेला नाही.


​ ​

संबंधित बातम्या