धोनीच्या निवृत्तीनंतर न्यूज चॅनलने लावला भलत्याच 'युवराज सिंग'ला फोन; VIDEO VIRAL  

टीम ई-सकाळ
Wednesday, 19 August 2020

धोनीने सेवानिवृत्तीची घोषणा केल्याची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी 'झी न्युज' या हिंदी वृत्तवाहिनीने लाईव्ह टेलिकास्टच्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग म्हणून भलत्याच व्यक्तीस फोन केला.

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनादिवशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवरून अचानक केलेल्या या घोषणेनंतर क्रिकेट जगतासह सर्वांनाच मोठा धक्का बसला. यानंतर धोनीने सेवानिवृत्तीची घोषणा केल्याची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी 'झी न्युज' या हिंदी वृत्तवाहिनीने लाईव्ह टेलिकास्टच्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग म्हणून भलत्याच व्यक्तीस फोन केला. आणि त्या व्यक्तीने देखील ऑन एअर असताना वृत्तवाहिनीची चांगलीच थट्टा केली. त्यामुळे सोशल मीडियावर देखील ही घटना चर्चेचा विषय ठरली. 

...जेंव्हा विराट कोहलीने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ; वाचा सविस्तर   

'झी न्युज' हिंदी वृत्तवाहिनीने धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील सेवानिवृत्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी, माजी भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंगला लाईव्ह कार्यक्रमामध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस कार्यक्रमातील अँकर असलेल्या व्यक्तीने भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग लाईव्ह कॉल वर असल्याचे सांगत, हा एक क्षण आहे जो आपल्या सर्वांनाच भावनिक बनवितो, जेव्हा जगातील सर्वात महान क्रिकेटपटू खेळाला अलविदा म्हणतो, असे म्हटले. आणि त्यानंतर याच्या काही विरामानंतर युवराज सिंग म्हणून ऑन एअर असलेल्या तिसऱ्याच व्यक्तीने चालू कार्यक्रमातच, मी तर युवराज सिंग बोलत नसल्याचे म्हणत, तुम्ही चुकीच्याच माणसाला फोन केल्याचे सांगितले. व तसेच यामुळे आशा आहे तुमच्या टीआरपीवर परिणाम होणार नाही, असे या व्यक्तीने म्हटले. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड     

त्यानंतर या संपूर्ण घटनेमुळे सोशल मीडियावर झालेल्या प्रसंगाची मोठी चर्चा सुरु झाली. याव्यतिरिक्त हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तर, भारतीय क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्‍वात इतिहास घडवणाऱ्या धोनीच्या निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. धोनीने 2007 पासून ते 2016 पर्यंत भारतीय संघाच्या नेतृत्व पदाची धुरा सांभाळली होती. या कालावधीत भारताने 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
         


​ ​

संबंधित बातम्या