एकमात्र कसोटीत भारताची दमदार सुरवात

सुनंदन लेले
Thursday, 14 June 2018

बंगळूर : अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला.

पहिल्या दिवशी 78 षटकांच्या खेळात भारताने 6 बाद 347 धावा उभारून सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. अखेरच्या सत्रात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारताच्या चार विकेट मिळवून सामन्यात थोडी जान आणली. 

प्रथम फलंदाजी करताना धवनच्या अफलातून फलंदाजीने अफगाणिस्तानचे गोलंदाज भांबावले. धवनने मुख्यत्वे रशिद खान आणि मुजीब रहमान या फिरकी गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. पहिल्या सत्रात मुजीबला दोन आणि रशिदला एक चौकार ठोकत धवनने उपाहारापूर्वी शतक ठोकण्याचा पराक्रम केला. 

कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पाच दिवसांचा सामना खेळणे किती वेगळे आहे याचा अनुभव अफगाणिस्तानने घेतला. उपाहारानंतर धवन बाद झाल्यावर विजयला लोकेश राहुलची साथ मिळाली. विजयनेही शतकी खेळी करत भारतीय फलंदाजीचे वर्चस्व राखले.

अफगाणिस्तानचे मुख्य अस्त्र ठरलेल्या रशिदला 26 षटकांत 120 धावांचे मोल मोजावे लागले. अखेरच्या सत्रात मात्र भारतीयांच्या विकेट झटपट पडल्या. विजय, राहुल, पुजारा, दिनेश कार्तिक झटपट बाद झाल्याने 1 बाद 280 धावसंख्येवरून खेळ संपताना भारताला 6 बाद 347 धावांपर्यंत पोचता आले. खेळ थांबला तेव्हा अश्‍विन आणि हार्दिक पंड्या खेळत होते. 

संक्षिप्त धावफलक :
भारत पहिला डाव 78 षटकांत 6 बाद 347
(शिखर धवन 107, मुरली विजय 105, लोकेश राहुल 54, चेतेश्‍वर पुजारा 35, यामिन अहमदझाई 2-32)

​ ​

संबंधित बातम्या