World Cup 2019 : अफगाणिस्तानच्या संघाचा हॉटेलमध्ये राडा

वृत्तसंस्था
Wednesday, 19 June 2019

अफगाणिस्तानचा संघ शून्य गुणांसह विश्वकरंडकातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरणार आहे. अशातच अफगाणिस्तानच्या संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ एका वादात अडकला आणि गोष्टी पोलिसांपर्यंत गेल्या. 

वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड : अफगाणिस्तानचा संघ शून्य गुणांसह विश्वकरंडकातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरणार आहे. अशातच अफगाणिस्तानच्या संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ एका वादात अडकला आणि गोष्टी पोलिसांपर्यंत गेल्या. 

इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्याच्या आदल्या रात्री मॅंचेस्टरमधील 'अकबर' हॉटेलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी गोंधळ घातला. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या माणसांपैकी कोणी तरी त्यांचा व्हिडिओ काढल्यामुळे संघातील काही खेळाडूंनी बाचाबाची करण्यास सुरवात केल्याची माहिती 'दि सन'ने दिली आहे. 

सोमवारी (ता.17) हॉटेलमध्ये गोंधळ झाल्याने पोलिसांना बोलविण्यात आले. मात्र, कोणाही अटक करण्यात आलेली नाही.  


​ ​

संबंधित बातम्या