घर नव्हते पण तुझा आधार होता; आईच्या निधनानंतर क्रिकेटर्सची भावूक पोस्ट

टीम ई-सकाळ
Friday, 19 June 2020

आईच्या निधनासंदर्भात राशिदने एक भावनिक ट्विट शेअर केली आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय की, आई माझ्यासाठी सर्वस्व होती....

काबूल: अफगानिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खान (Rashid Khan) याच्या आईचे निधन झाले आहे. स्टार क्रिकेटर्सची आई बऱ्याच दिवसांपासून अंथरुणाशी खिळून होती. अखेर तिची प्राणज्योत मालवली आहे. ट्विटच्या माध्यमातून खुद्द राशिदने यासंदर्भातील माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यापूर्वी आई गंभीर आजारी असताना देखील राशिदने ट्विटच्या माध्यमातून प्रार्थना करा, असे आवाहन आपल्या चाहत्यांना केले होते.  

#क्रिकेट_डायरी: कसोटीत सलामीला 'नाकाम' ठरलेले त्रिकूट 

आईच्या निधनासंदर्भात राशिदने एक भावनिक ट्विट शेअर केली आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय की, आई माझ्यासाठी सर्वस्व होती. माझ्याजवळ घर नव्हते पण आईच्या प्रेमामुळं मला त्याची उणीव कधीच भासली नाही. ती माझ्यासोबत नाही यावर विश्वास बसत नाही. आईच्या आठवणींचे कधीही विस्मरण होणार नाहीत, अशा आशयाचे भावनिक ट्विट राशिदने केले आहे. राशिद खान अनेक वर्षांपासून घर सोडून रेफ्यूजी कॅम्पमध्ये राहत आहे. त्यामुळे त्याने माझ्याकडे घर नव्हते पण आई तू होतीस. असा उल्लेख केला आहे. आई माझे घर होती असेही त्याने यात म्हटले आहे.  2018 मध्ये राशिद खानच्या वडिलांचे निधन झाले होते. यावेळी राशिद खान ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये एडिलेड स्ट्राइकरकडून खेळत होता.  

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना या दिग्गज क्रिकेटर्संनी वाहिली श्रद्धांजली

2019 च्या विश्वचषकानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने राशिद खानकडे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटच्या नेतृत्वाची धूरा दिली आहे.  राशिदने आतापर्यंत   4 कसोटी, 71 वनडे आणि 48 टी20 सामन्यात अफगाणिस्तानचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे 23, 133 आणि 89 बळी मिळवले आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या