आदिल रशिदने लॉर्डसवर केला 'झिरो प्ले'चा विक्रम

वृत्तसंस्था
Monday, 13 August 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशिदने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सामन्यात एकदाही फलंदाजी, गोलंदाजी न करणारा, फलंदाजाला धावबाद न करणारा आणि झेलही न घेणारा तो क्रिकेटविश्वातील 14वा तर इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. 

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशिदने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सामन्यात एकदाही फलंदाजी, गोलंदाजी न करणारा, फलंदाजाला धावबाद न करणारा आणि झेलही न घेणारा तो क्रिकेटविश्वातील 14वा तर 13 वर्षांत इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. 

 

रशिदला कसोटी संघात परतल्यावर 12,500 डॉलर एवढा पगार देण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एकदाही फलंदाजी किंवा गोलंदाजी केली नाही. त्याशिवाय त्याने भारताच्या कोणत्याही फलंदाजाला धावबाद केले नाही तर एकही झेल घेतला नाही. 

भारताच्या दोन्ही डावांमध्ये स्वींग गोलंदाजीला पोषक वातावरण असल्याने अॅंडरसन आणि ब्रॉडने उत्तम गोलंदाजी केली. यामुळे लॉर्डसवरील प्रेक्षकांप्रमाणेच रशिदलाही बघ्याची भूमिका घ्यावी लागली. तसेच फलंदाजीला त्याची संघी येईपर्यंत कर्णधार ज्यो रुटने इंग्लंडचा डाव घोषित केला.  

यापूर्वी इंग्लंडच्या गॅरेथ बॅटी यांनी 2005मध्ये बांगलदेशविरुद्ध खेळताना असाच विक्रम केला होता. 

संबंधित बातम्या