गिलख्रिस्ट सेहवागला का म्हणाला, बिबट्या शिकार सोडत नाही

वृत्तसंस्था
Sunday, 9 September 2018

नवी दिल्ली : भारताचा आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवागची या वयातही फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टने बिबट्या कधीही आपली शिकार सोडत नाही, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारताचा आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवागची या वयातही फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टने बिबट्या कधीही आपली शिकार सोडत नाही, असे म्हटले आहे.

सेहवागने कर्नाटक चालना चित्र करंडक (केसीसी) स्पर्धेत कदंबा लायन्स संघाकडून बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना खेळला. या सामन्यात सेहवागने जोरदार फटकेबाजी करत धावा केल्या. दहा षटकांच्या या सामन्यात सेहवागने षटकार खेचतानाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला.

त्या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते, की खेळण्याची शैली तेव्हाही तशीच होती आणि आताही तशीच आहे. त्यामुळे शुभकामात वेळ कशाला घालवायचा. मनोरंजन, मनोरंजन, मनोरंजन फलंदाजीचा आनंद घेत आहे.

सेहवागच्या याच व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना ऍडम गिलख्रिस्टने ट्विट करत म्हटले आहे, की बिबट्या आपली शिकार कधीच विसरत नाही, जरी तो म्हातारा झाला तरी. जोरदार फटकेबाजी.

​ ​

संबंधित बातम्या