#वर्णभेदाचा_खेळ: बॅकफूटवर आलेल्या सॅमीला स्वराचा बाउन्सर!

टीम ई-सकाळ
Friday, 12 June 2020

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यू नंतर सुरु झालेल्या ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनामुळे वर्णभेदासंबंधित अनेक घटना जगासमोर येऊ लागल्या. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी समर्थन देत आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यानंतर आता चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री स्वरा भास्कर हीने देखील वर्णभेदावर भाष्य करताना, वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने केलेल्या आरोपांवर आपले विचार मांडले आहेत.    

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूनंतर सुरु झालेल्या ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनामुळे वर्णभेदासंबंधित अनेक घटना जगासमोर येऊ लागल्या आहेत. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी समर्थन देत आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यानंतर आता चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील वर्णभेदावर भाष्य करताना, वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने केलेल्या आरोपांवर आपले मत मांडले आहे.    

IPL बाबत दादा ठाम; आर्थिक संकटावर मात करण्यासाठी असा असू शकेल 'गेम_प्लॅन'       

अमेरिकेत श्वेत पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या मारहाणीत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जगभरात वर्णभेदाविरुद्ध आवाज उठण्यास सुरवात होऊन, ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे आंदोलन सुरु झाले. त्यानंतर वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील सामन्यांच्या वेळेस आपल्याला वर्णभेदाचा अनुभव आल्याचा गौप्यस्फोट केला होता. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळत असताना अनेक खेळाडू आपल्याला काळू या नावाने संबोधायचे. मात्र त्यावेळेस आपल्याला या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. पण नंतर या शब्दाचा अर्थ कळल्यानंतर आपल्याला दुःख झाल्याचे डॅरेन सॅमीने म्हटले होते. यावर आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने प्रतिक्रिया दिली आहे.सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी डॅरेन सॅमीची जाहीर माफी मागण्याचे आवाहन तिने केले आहे.        

विराट ब्रिगेड या दौऱ्यासाठी सज्ज; सरकारी परवान्याची प्रतिक्षा

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने वर्णभेदाच्या मुद्द्यावर पुढे बोलताना, सनरायझर्स हैदराबाद संघाच्या या खेळाडूंनी माफी न मागितल्यास अशा खेळाडूंच्या नावाचा खुलासा करणार असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर एक ट्विट करत सॅमीने मुद्दा लावून धरणार नसल्याची भूमिका घेतली होती.  डॅरेन सॅमीने एक ट्विट करत आपण या संदर्भात एकाशी चर्चा केल्याचे सांगून या प्रसंगी एकजुटता दाखवणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. तसेच त्या व्यक्तीने आपण सर्व प्रेम सदभावना असलेल्या ठिकाणावरून येत असल्याचे सांगितल्याचा उल्लेख डॅरेन सॅमीने ट्विटमध्ये केला होता. डॅरेन सॅमीच्या या ट्विटवर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने रिप्लाय दिलाय. कोणतीही व्यक्ती केवळ प्रेम सदभावना या ठिकाणावरून आहे आणि म्हणून एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तीला एक ठराविक शब्द 'एन' वापरात असल्यास त्याबद्दल तुझे काय मत आहे, असा प्रश्न तिने उपस्थित केलाय. सॅमीचा अपमान करणाऱ्यांनी स्वत: समोर येऊन माफी मागावी, असेही स्वरा म्हटली आहे.  

जाफरने अनमोल सेहवागकडे केला कानाडोळा; भज्जी म्हणाला असं का? 

स्वरा भास्करच्या या ट्विटवर डॅरेन सॅमीने पुन्हा रिप्लाय दिला असून, यामध्ये त्याने वर्णभेदाच्या या घटनेकडे दुर्लक्ष करत नसून फक्त यावेळी एकजूट होणे महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. जेणेकरून पुढे अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत. आणि जेंव्हा एखाद्याला आपली चूक उमगते तेव्हाच ती व्यक्ती माफी मागते. मला कृष्णवर्णीय असल्याचा अभिमान असल्याचे त्याने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.            
          
 

 
  


​ ​

संबंधित बातम्या