शास्त्रींसोबत 'डेटिंग'विषयी काय म्हणाली निमरत 

वृत्तसंस्था
Monday, 3 September 2018

भारताच्या चौथ्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर शास्त्री यांचे संघाकडे लक्ष नाही, त्यांचे निमरतबरोबर अफेयर सुरू असल्याच्या वृत्ताने सोमवारी सोशल मीडिया दणाणून गेला. याबाबत शास्त्री यांचे काहीच वक्तव्य आले नसले, तरी निमरत कौर हिने मात्र या सगळ्याचा इन्कार केला आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अभिनेत्री निमरत कौर यांच्यात डेटिंग सुरू असल्याच्या वृत्ताने सोमवारी सोशल मीडियावर भरभरून वाहत होते. मात्र, या वृत्तात काहीच तथ्य नसल्याचे ट्‌विट करताना कौर हिने या सगळ्या वृत्तांची खिल्ली उडविली आहे. 

भारताच्या चौथ्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर शास्त्री यांचे संघाकडे लक्ष नाही, त्यांचे निमरतबरोबर अफेयर सुरू असल्याच्या वृत्ताने सोमवारी सोशल मीडिया दणाणून गेला. याबाबत शास्त्री यांचे काहीच वक्तव्य आले नसले, तरी निमरत कौर हिने मात्र या सगळ्याचा इन्कार केला आहे. आपले कुठल्याच माजी क्रिकेटपटू बरोबर अफेयर चालू नसल्याचे ट्‌विट तिने केले आहे. या वृत्ताशी आपला कसलाच संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. 

एका दैनिकाने सर्वप्रथम शास्त्री आणि निमरत यांचे दोन वर्षांपासून अफेयर सुरू असल्याचे वृत्त दिले होते. ऑडी या कारच्या ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून शास्त्री आणि निमरत यांची निवड झाली होती. तेव्हापासून या दोघांच्या सातत्याने भेटी होत आहेत. शास्त्री यांचा चार वर्षांपूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला आहे.


​ ​

संबंधित बातम्या