एसी मिलानची तब्बल सोळाव्या क्रमांकावर घसरण

वृत्तसंस्था
Monday, 30 September 2019

- अवघ्या काही वर्षांपूर्वी युरोपातील ताकदवान संघात गणना होत असलेले एसी मिलान सिरी ए या इटलीतील साखळीतच आता सोळाव्या क्रमांकावर घसरले आहेत

-एसी मिलानला फ्लोरेंटिनोविरुद्ध 1-3 हार पत्करावी लागली

- सेविलाविरुद्धच्या पराभवामुळे रेयाल सोशिएदादची ला लिगामध्ये अव्वल स्थान मिळवण्याची संधी हुकली. रेयाल आणि ऍटलेटिको माद्रिद यांच्यातील लढत बरोबरीत सुटल्याने रेयाल सोशिएदादला अव्वल स्थान मिळवण्याची संधी होती

- कामगिरीत सातत्य नसलेल्या मार्सेलीला लीग वनमधील अव्वल चार संघांतून बाहेर जावे लागले. त्यांना रेनेसविरुद्ध 1-1 बरोबरी स्वीकारावी लागली

रोम -  अवघ्या काही वर्षांपूर्वी युरोपातील ताकदवान संघात गणना होत असलेले एसी मिलान सिरी ए या इटलीतील साखळीतच आता सोळाव्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांना सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. 
एसी मिलानला फ्लोरेंटिनोविरुद्ध 1-3 हार पत्करावी लागली. त्याचवेळी मारिओ नापोलीने विजयी मार्गावरून वाटचाल करताना ब्रेसियाला 2-1 असे हरवले. एसी मिलानच्या पीछेहाटीमुळे नवे मार्गदर्शक मार्को गिआमपाओलो यांची गच्छंती कधी, हीच चर्चा सुरू झाली आहे. कधीच सराव झाला नाही अशा संघाची कामगिरी जशी होईल तसा खेळ झाला, असे गिआमपाओलो यांनी सांगितले. आघाडीवरील इंटर मिलानने एसी मिलानला तब्बल दहा गुणांनी मागे टाकले आहे. 

सेविलाचा चमकदार विजय 
माद्रिद ः सेविलाविरुद्धच्या पराभवामुळे रेयाल सोशिएदादची ला लिगामध्ये अव्वल स्थान मिळवण्याची संधी हुकली. रेयाल आणि ऍटलेटिको माद्रिद यांच्यातील लढत बरोबरीत सुटल्याने रेयाल सोशिएदादला अव्वल स्थान मिळवण्याची संधी होती. पण, सेविलाने पिछाडीनंतर 3-2 बाजी मारली. या मोसमात नवे 12 खेळाडू खरेदी केलेले सेविला सहावे आहेत. पण, त्यांच्यात आणि आघाडीवरील संघात दोनच गुणांचा फरक आहे. अग्रस्थान हुकलेले सोशिएदाद, बार्सिलोना आणि सेविलाचे गुण समान आहेत. 

मार्सेलीची पीछेहाट 
पॅरिस ः कामगिरीत सातत्य नसलेल्या मार्सेलीला लीग वनमधील अव्वल चार संघांतून बाहेर जावे लागले. त्यांना रेनेसविरुद्ध 1-1 बरोबरी स्वीकारावी लागली. मार्सेलीने पहिल्या आठपैकी तीनच लढती जिंकल्या आहेत, ते आता पाचवे आहेत. ते आणि आघाडीवरील पीएसजी यांच्यात पाच गुणांचा फरक आहे. 


​ ​

संबंधित बातम्या