एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी अभिज्ञा पाटीलची निवड 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिची (दोहा) कतारमध्ये होणाऱ्या चौदाव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत. 

खोची - पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिची (दोहा) कतारमध्ये होणाऱ्या चौदाव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत. 

नुकत्याच दिल्ली येथे डॉ. करण सिंग शूटिंग रेंजमध्ये ट्रायल सहा आणि सात नेमबाजी स्पर्धा झाल्या. स्पर्धेमध्ये अभिज्ञाने 600 पैकी 576 गुणांची कमाई करून या एशियन शूटिंग चॅम्पियन नाव पक्के केले. ती जिल्हा क्रिडा प्रबोधनी कोल्हापूरची अनिवासी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य चंद्रशेखर साखरे यांचे मार्गदर्शन मिळाले. तिला गगन नारंग शूटिंग फाउंडेशन, पुणेचे पवन सिंग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

तिला आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत, गगन नारंग, सय्यद तौसिफ, वेद सर, संदीप तरटे, अजित पाटील, जितेंद्र विभुते, युवराज साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. यशश्री उद्योग समूह पुणे विकासराव पाटील आणि विद्यासागर पाटील 
तिला श्रीकृष्ण उद्योग समूह (खोची) संस्थापक अध्यक्ष बी. के. चव्हाण व माजी सरपंच एम. के. चव्हाण आणि श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ, पेठवडगावचे अध्यक्ष माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, सचिव व माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांचे पाठबळ लाभले. मंत्री चंद्रकांत पाटील तसेच आई प्रतिभा पाटील, वडील अशोक पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. 


​ ​

संबंधित बातम्या