डिव्हिलियर्सकडून अखेर निवृत्तीचे कारण स्पष्ट

वृत्तसंस्था
Monday, 20 August 2018

''सतत दिवस-रात्र तुम्हाला दडपणाचा सामना करावा लागतो आणि ते कधी कधी असह्य होते.'' असे म्हणत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली : चार महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घोषित करत सर्वांना धक्का दिला. ''सतत दिवस-रात्र तुम्हाला दडपणाचा सामना करावा लागतो आणि ते कधी कधी असह्य होते.'' असे म्हणत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. 

त्याने 114 कसोटी, 228 एकदिवसीय आणि 78 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. प्रक्षेकांच्या अपेक्षांचे खूप ओझे झाल्याचेही त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, ''तुमचे चाहते, देश, प्रशिक्षक यांच्याअपेक्षांमुळे तुम्ही स्वत:वर खूप दडपण घेता.''

डिव्हिलियर्सने एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मागील काही काळात तो दुखापती आणि कुटुंबाला वेळ देण्याच्या कारणामुळे सतत संघा बाहेर होता.  निवृत्ती घेतल्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, ''मी क्रिकेटपासून दूर झाल्याचा मली आनंदच आहे. निवृत्त झाल्याचा मला अजिबात पश्चाताप नाही.''

संबंधित बातम्या