'या' आठ कारणांमुळे झाला भारताचा पराभव

वृत्तसंस्था
Monday, 3 September 2018

भारताला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. याच पराभवासह भारताने पाच सामन्यांची मालिकाही गमावली. या मालिकेतील अखेरचा सामना बाकी असला तरी ती फक्त औपचारिकता आहे. भारतीय संघाबांधणीबद्दल या मालिकेच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या मालिकेतील पराभवाचा विचार करता संघबांधणीतच मूळ प्रश्न आहेत हे स्पष्ट होते.a

भारताला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. याच पराभवासह भारताने पाच सामन्यांची मालिकाही गमावली. या मालिकेतील अखेरचा सामना बाकी असला तरी ती फक्त औपचारिकता आहे. भारतीय संघाबांधणीबद्दल या मालिकेच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या मालिकेतील पराभवाचा विचार करता संघबांधणीतच मूळ प्रश्न आहेत हे स्पष्ट होते.

मालिका पराभवाची काही महत्त्वाची कारणे :
1. सलामीचा तिढा : भारताचे सलामीवीर, मुरली विजय, शिखर धवन आणि लोकेश राहुल या तिघांनाही चार कसोटी सामन्यांमध्ये एकही अर्धशतक करता आलेले नाही. तिसऱ्या सामन्यात दोन्ही डावांमध्ये धवन आणि राहुल यांनी भारताला चांगली सुरवात करुन दिली होती. या एकमेव सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. सलामीला सतत बदल हा देखील यातील मोठा दुवा मानावा लागेल.

2. विराट=11 : भारताचा कर्णधार विराट कोहली सोडता भारताच्या एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. विराटने चार सामन्यात मिळून 544 धावा केल्या. त्याच्याशिवाय फक्त चेतेश्वर पुजाराने फलंदाजीत समाधानकारक कामगिरी आहे. इतर एकाही फलंदाजाला चमक दाखविता आलेली नाही. फलंदाजी हा या मालिकेतील सर्वांत मोठे अपयश आहे. 

3. अष्टपैलू कामगिरीचा अभाव : इंग्लंडसाठी सॅम करन आणि ख्रिस वोक्स यांनी अष्टपैलू खेळाडूची जबाबदारी अत्यंत चोख पार पाडली. हेच भारतीय संघात मात्र झाले नाही. हार्दिक पंड्याने फक्त तिसऱ्या सामन्यात कामगिरी उंचावली. मात्र त्याने संपूर्ण मालिकेत अष्टपैलू खेळाडू म्हणवून घेण्यासाठी कामगिरी केलेली नाही. तसेच भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन यानेही कसोटी क्रिकेटमध्ये चार शतके ठेकली आहेत. मात्र त्याला एकाही सामन्यात फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. 

4. संघनिवडीतील चुका : कसोटी क्रिकेट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराला पहिल्या सामन्यात संघाबाहेर बसवण्यात आले. दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवला दुसरा फिरकी गोलंदाज म्णून खेळवण्यात आले, मात्र खेळपट्टी वेगवान गोलंदाजांनी पोषक होती. सर्वच सलमीवार अपयशी होत असताना फक्त मुरली विजयलाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

5. संधी सोने करता न येणे : भारताला प्रत्येक सामन्यात हाती आलेल्या संधीचे सोने करण्यात अपयश आले. पहिल्या सामन्यात गोलंदाजांनी इंग्लंडची 87/7 अशा बिकट परिस्थिती केली असतानाच शिखर धवनने मोईन अलीचा झेल सोडला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. तसेच चौथ्या सामन्यात इंग्लंडला 86/6 असे रोखल्यावर तळातील फलंदाजांना बाद करण्यात गोलंदाजांना अपयश आले आणि त्यामुळेच इंग्लंडने 246 धावांचे आव्हान उभे केले. 

6. विकेटकिपरचे अपयश : भारताचे दोन्ही यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत या दोघांनाही फलंदाजीत छाप पाडता आलेली नाही. याउलट इंग्लंडचे यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो आणि जॉस बटलर या दोघांनीही फलंदाजीत मोलाचे योगदान दिले आहे. 

7. अश्विनचे अपयश : चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा विश्वासू फिरकी गोलंदाज अश्विनला प्रभाव पाडण्यात अपयश आले. इंग्लंडने दोन वर्षांपूर्वीच पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताकची फिरकी गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या याच दुरदृष्टीने भारताचा चौथ्या कसोटी सामन्यात घात केला. मोईन अलीची फिरकी प्रभावी ठरली, तर त्याच खेळपट्टीवर अश्विन पूर्णपणे अपयशी ठरला.

8. नाविण्य आणि आत्मविश्वाचा अभाव : भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यापासूनच इंग्लंडच्या गोलंदाजीचे दडपण घेऊन खेळत होता. अशात त्यांनी आपल्या फलंदाजीत नवीन प्रयोग केलेच नाहीत. 'Out of the box' विचार न केल्याचा फटका भारतीय संघाला या मालिकेत बसला.


​ ​

संबंधित बातम्या