क्रिकेटविश्वात खळबळ;  8 खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा संशय

वृत्तसंस्था
Tuesday, 25 September 2018

आशिया करंडकाची धामधूम सुरु असतानाच क्रिकेटविश्वातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये मॅच फिक्सिंगमध्ये काही आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि कर्णधारांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविली गेली आहे. 

नवी दिल्ली : आशिया करंडकाची धामधूम सुरु असतानाच क्रिकेटविश्वातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये मॅच फिक्सिंगमध्ये काही आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि कर्णधारांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविली गेली आहे. 

''मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात सर्वाधिक भारतीय बुकींचा समावेश आहे. मॅच फिक्सिंगचे हे जाळं इतके वाढले आहे की बुकींना पकडणे आयसीसीलाही फार अवघड झाले आहे,'' असे त्या अहवालात म्हटले आहे. आठ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा यात सहभाग असण्याची शक्यता असून यात पाच कर्णधारांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

भ्रष्टाचार विरोधी पथकाचे जनरल मॅनेजर अॅलेक्स मार्शल यांनी 'या' आठ संशयित खेळाडूंविषया जास्त माहिती देण्यास नकार दिला असला तरी हे सर्व खेळाडू आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्य देशांच्या संघातील आहेत असे त्यांनी सांगितले. गेल्या एका वर्षात आयसीसीने फिक्सिंगच्या 32 प्रकरणांची चोकशी केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या