जोर लगा के ट्रेक

हर्षल निकम
Monday, 30 July 2018

20 मे 2018 रविवारची पहाट. आमच्या सर्व इनव्हेंचर ऍकॅडमी ऑफ स्पोर्टस्‌च्या खेळाडू व पालकांच्या मनात एक चैतन्य निर्माण करणारी होती. त्याला कारणही तसेच होते. ते म्हणजे जोर गाव ते घुमंटी या जंगलातील 14 किलोमीटर सहल. वाईपासून धोम धरणाच्या पुढे 20 कि.मी. अंतरावर जोर या अतिशय दुर्गम गावातून आमची पदभ्रमंती सुरू होणार होती. 

20 मे 2018 रविवारची पहाट. आमच्या सर्व इनव्हेंचर ऍकॅडमी ऑफ स्पोर्टस्‌च्या खेळाडू व पालकांच्या मनात एक चैतन्य निर्माण करणारी होती. त्याला कारणही तसेच होते. ते म्हणजे जोर गाव ते घुमंटी या जंगलातील 14 किलोमीटर सहल. वाईपासून धोम धरणाच्या पुढे 20 कि.मी. अंतरावर जोर या अतिशय दुर्गम गावातून आमची पदभ्रमंती सुरू होणार होती. 

या पदभ्रमंतीच्या नियोजनासाठी आम्ही 'एव्हरेस्टवीर' चेतन केतकर दादांचे मार्गदर्शन घेणार होतो. त्यानेचॉ पदभ्रमंती कशी करायची आहे, कोणत्या गोष्टी लागणार आहेत, याची एक यादीच दिल्यामुळे आम्ही सर्वांना ती यादी सविस्तरपणे कळवली, त्यानुसार जय्यत तयारीनिशी पहाटे 5.00 वाजता हॉटेल विश्‍व, सणस ग्राऊंडजवळ 100 मुले व पालक जमा झाले होती. मुलांची हजेरी घेऊन त्यांच्या जोड्या तयार करून 25 चे 4 गट तयार करण्यात आले व 2 बसमध्ये त्यांना बसवून "गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत आम्ही 5.34 वा. वाईकडे प्रयाण केले. रविवार असल्यामुळे पुणे-कोल्हापूर हायवेला बरीच गर्दी होती. 

मजल-दरमजल करत आम्ही सुरूर फाट्याजवळ पोचली. सुरूर ते वाई रस्त्यावर हॉटेल 'गंधर्व' या ठिकाणी विसावा घेऊन 8.00 वाजता चहा घेतला. ताजेतवाने झाल्यावर लगेच आम्ही बसमध्ये बसलो व पुढील प्रवासास सुरवात झाली. 10 ते 15 मिनिटांत वाई आले. आमच्या बस मोठ्या होत्या व रस्ता लहान असल्याने बस हळूहळू जात होत्या. जाताना धोम धरणाचे विस्तीर्ण पात्र उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला पसरणी घाटाचे विलोभनीय दृश्‍य खूपच सुंदर दिसत होते. हा सर्वच भाग पाण्यामुळे समृद्ध होता. हिरवीगार पिके अतिशय सुंदर दिसत होती. 20 कि.मी. अंतर गेल्यावर जोर गावाजवळ धरण जवळ आले. 

धरणाच्या उजव्या बाजूने डोंगराचा नागमोडी वळणा-वळणाचा रस्ता जोर गावात आम्हाला कधी घेऊन गेला ते कळलेच नाही. पाचगणीचा डोंगर व त्यावरील घरे व जोर धरणातील पाणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. जोर गावात पोचल्यावर आम्ही मंदिराजवळ पोचलो. तेथेच आम्हाला बसमधून खाली उतरावे लागणार होते. कारण त्यापुढे बसला जाण्यासाठी रस्ताच नव्हता. चेतन दादाने सर्व गटांना व्यवस्थित सूचना दिल्या. कोणीही गोंगाट करायचा नाही, प्लास्टिक, चॉकलेटचे कागद, वॉटर बॉटल्स रस्त्यावर, पायवाटेवर दिसल्यास गोळा करायला सांगितले. त्याचबरोबर हा भाग किती दुर्गम आहे. पावसाळ्यात जोर गावातील पुढील गावांचा संपर्क कसा तुटायचा आता पूल झाल्यामुळे गावकऱ्यांचे जीवन कसे सुकर झाले आहे, ते सांगितले व परत एकदा आम्ही महाराष्ट्राचे कुलदैवत श्री छत्रपती 'शिवाजी महाराज की जय,' 'जय भवानी, जय शिवाजी' असा जयघोष करत पुलावरून धनगरवाडीकडे निघालो. साधारण 500 मीटर अंतर गेल्यावर आम्ही धनगरवाडीत श्री. गणेश ढेपे यांच्या घरी पोहचलो. तिथेच आम्ही दुपारच्या जेवणाची व्यवस्था भात आणि आमटी अशी केली होती. पुढे आम्ही घुमटी गावाकडे प्रयाण केले. 

गाडीतच आम्ही नाश्‍ता केल्यामुळे या वेळी आमचा वेळ कारणी लागला होता. साधारण 1 कि.मी. अंतर गेल्यावर एक मोठा कोरडा ओढा लागला. त्याचे पात्र बरेच मोठे होते. यांचा अंदाज त्यात असणाऱ्या मोठ्या दगड-गोट्यांमुळे येत होता. ओढा पार केल्यावर आता जंगलच सुरू झाले होते. त्यामुळे दाट झाडी सुरू झाली होती. दादाने सांगितले, हे सर्व जावळी खोऱ्याच्या जंगलाचाच एक भाग आहे. आमच्या गटात 3 वर्षांच्या अर्जुनपासून ते 57 वर्षांच्या सौ. अंजली भावे यांचा समावेश असल्याने सर्वांचा अंदाज घेत मार्गक्रमण करावे लागत होते. 4 गट असल्याने थोडा वेळ लागत होता, पण सर्व मुलेही शारीरिकदृष्ट्या सक्षम होती. 

कारण सणस क्रीडांगणावर ती रोजच व्यायाम करण्यासाठी नियमित येत असल्याने त्यांची शारीरिक क्षमतेचा चांगलाच कस या ठिकाणी लागत होता. दररोज व्यायाम केल्याने कसा फायदा होतो, हे मुलांना आता या पदभ्रमंतीमुळे स्वतःलाच कळाले होते. सर्व पायवाट उंच झाडांनी व्यापली असल्यामुळे उन्हाचा त्रास तर झालाच नाही आणि वार असल्याने हवेत छान गारवा जाणवत होता. टप्प्याटप्प्याने आम्ही चालत राहिलो. दुपारी 1 च्या सुमारास आम्ही घुमटीच्या टोकावर पोचलो. तिथे मंदिर म्हणजे एका मोठ्या दगडाखाली 4 देवतांच्या मूर्ती विराजमान होत्या. त्या ठिकाणी पोचताच आम्हाला सावलीत आपल्या पूर्वजांनी म्हणजेच माकडांनी दर्शन दिले. मुलांनी लगेच त्यांना आपापल्या डब्यातील खाऊ देण्यास सुरवात केली. दहा मिनिटे विश्रांती घेतल्यावर चेतन दादाने गटा-गटाने परिसराची माहिती सांगण्यास सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा व्यापारी मार्ग होता, असे सांगितले व या मार्गावर चंद्रगडाला टोल चौकीचे स्वरूप प्राप्त होते. चंद्रगडाचे पलीकडे मंगळगड, प्रतापगड व जावळीचे खोरे याबाबत माहिती सांगितली. 4 गटांनी माहिती झाल्यावर लगेच आम्ही परतीच्या प्रवासास सुरवात केली. परत येताना सर्व उतार असल्याने आम्ही 2.30 वा. दुपारी परत धनगरवाडीत गणेश ढेपे यांच्या घरी पोचलो. तिथे मुलांनी आणलेले डबे व भात आणि आमटी याचा यथेच्छ आस्वाद पत्रावळीवर घेतला. 

काही मुलांनी पत्रावळीचे ताट पाहून नवलच केले. संपूर्ण घरच त्यांनी आम्हाला जेवणासाठी दिल्याने एकाच वेळी सर्वांना जेवण करता आले. जेवण झाल्यावर ढेपे कुटुंबीयांचे आभार मानत तिथेच सहलीतील गटप्रमुखांचे कौतुक करण्यात आले. सर्वांचा एकत्र फोटो घेण्यात आला व आम्ही परतीच्या प्रवासास लागलो. 14 कि.मी. चालणे झाल्यानंतरसुद्धा मुले दमलेली दिसत नव्हती. त्या सुंदर वातावरणातून निघूच वाटत नव्हते. बसमध्ये बसल्या नंतर आम्ही जोर गावातून निघालो. 4.00 वाजले होते. वाटेत पुन्हा जोर धरणाचा परिसर धोम धरणाचा परिसर मन प्रसन्न करत होता. मुले दमली असल्यामुळे झोप घेत होती. वाईजवळ परत आम्ही गंधर्व हॉटेलवर 6.30 वा. नाश्‍ता केला. मुलांनी त्यावर यथेच्छ ताव मारला. 

7.30 वा. आम्ही पुण्याकडे कूच केली. बसमध्ये मुले गाण्यांवर नाचत होती. अशा या सहलीत दिवस कधी संपला याचे भानच राहिले नाही. 9.30 वा. आम्ही पुन्हा सणस ग्राऊंडजवळ पोचलो. मुलांचे पालक आलेच होते. पुन्हा एकदा हजेरी घेऊन मुलांना पालकांकडे सोडण्यात आले. संबंध भ्रमंतीमध्ये जंगलात कुठेच प्लास्टिक, रिकाम्या बाटल्या, कागद कुठे दिसलेच नाहीत व मुलांनी सुद्धा आपला कचरा आपल्या बरोबर आणला. निसर्गाची मजा अशाप्रकारे लुटण्यात मुलांना सुद्धा मनापासून प्रयत्न केला. निसर्गाचा समतोल कसा राखावा याचे सुद्धा भान मुलांना या सहलीमध्ये शिकता आले. सहलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात ही सहल एक अविस्मरणीय अनुभव देणारी ठरेल.

संबंधित बातम्या