क्रिकेट_डायरी : या पाच भारतीय फलंदाजांनी पहिल्या ODI शतकासाठी खूप वेळ घेतला!

टीम ई-सकाळ
Wednesday, 24 June 2020

#क्रिकेट_डायरीच्या माध्यमातून नजर टाकूयात वनडे कारकिर्दीतील पहिल्या  शतकासाठी सर्वाधिक काळ संघर्ष करावा लागलेल्या पाच फलंदाजाच्या आकडेवारीवर 

मुंबई : भारतीय क्रिकेटसंघाला अनेक दिग्गज फंलदाज लाभले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा महारथी भारतीय संघात आहे. क्रिकेटमधील देवाची उपमा लाभलेल्या सचिन तेंडुलकरनेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यात पहिले द्विशतक झळकावले होते. सुनील गावसकर यांचे देखील भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान आहे. आज आपण #क्रिकेट_डायरीच्या माध्यमातून वनडे कारकिर्दीतील पहिल्या  शतकासाठी सर्वाधिक काळ संघर्ष करावा लागलेल्या पाच फलंदाजाच्या आकडेवारीवर नजर टाकणार आहोत.  

Happy Birthday Sunil Gavaskar: 'Little Master' turns 70 - Newsroom ...सुनील गावसकर

आपल्या फलंदाजीने एक काळ गाजवणारे सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर क्रिकेट जगतात आपला दबदबा दाखवून दिला. 125 कसोटी सामन्यात 34 शतके ठोकणाऱ्या गावसकर यांनी एकदिवसीयमध्ये एकमात्र शतक झळकावले आहे. यासाठी त्यांना 100 वेळा फलंदाजी करावी लागली. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्यांनी एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले आणि एकमेव शतक झळकावले. 88 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह त्यांनी हे शतक पूर्ण केले होते.  1974 ते 1987 दरम्यान गावसकर यांनी 108 एकदिवसीय सामन्यात 102 वेळा फलंदाजी केली. यातील हे एकमेव शतक आहे. या प्रकारात त्यांच्या नावे 27 अर्धशतके आहेत. 

Happy Birthday Sachin : मास्टर-ब्लास्टर सचिनचा ...सचिन तेंडुलकर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करुन सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि  एकदिवसीय सामन्यात पहिले द्विशतक झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही पहिल्या शतकासाठी खूपच प्रतिक्षा करावी लागली होती. सचिनने वनडेतील पहिले शतक करण्यासाठी 75 वेळा फलंदाजी केली.  1994 मध्ये श्रीलंकेतील कोलोंबोच्या मैदानात सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात महत्त्वपूर्ण शतकी खेळी साकारली होती. या सामन्यात त्याने 130 चेंडूत 110 धावांची खेळी केली होती.  

Yuvraj Singh: Tale of a talisman

युवराज सिंग

भारतीय संघाचा अष्टपैलू आणि षटकाराचा बादशहा अशी ज्याची ओळख आहे त्या युवराजने भारतीय संघासाठी मोठे योगदान दिले. भारतीय संघाला अनेक सामने जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या युवीलाही वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकवण्यासाठी खूप वेळ लागला होता. 60 व्या डावात त्याने पहिले शतक झळकावले.  बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात युवराजने 9 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 85 चेंडूत 102 धावांची खेळी केली होती. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर आणि झहिर खान-आगरकर यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय संघाने सामनाही जिंकला होता.  

Krishnamachari Srikkanth 60 from 60 vs Aus | Vintage Cricket - YouTubeकृष्णम्माचारी श्रीकांत

 25 नोव्हेंबर 1981 मध्ये भारतीय वनडे संघात पदार्पण करणाऱ्या श्रीकांत यांनी भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. 1983 च्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असणाऱ्या श्रीकांत यांनी आपले पहिले शतक ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध झळकावले होते. या शतकासाठी त्यांना 58 वेळा फलंदाजी करावी लागली.  ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी 102 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. जयपूरच्या मैदानात 7 सप्टेंबर 1986 मध्ये रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने निर्धारित 47 षटकात 250 धावा केल्या होत्या. के श्रीकांत यांनी केलेल्या 102 धावांच्या जोरावर भारताने हा सामना 7 गडी आणि 36 चेंडू राखून जिंकला होता. 

Mohinder Amarnath - YouTubeमोहिंदर अमरनाथ

भारतीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू म्हणून नावजलेले नाव म्हणजे मोहिंदर अमरनाथ. त्याकाळी भेदक गोलंदाजी असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध मोहिंदर अमरनाथ यांनी वनडे कारकिर्दीतील आपले पहिले शतक झळकावले होते. त्यांनी 85 एकदिवसीय सामन्यातील 75 डावात दोन शतके झळकावली आहेत. वनडेत त्यांच्या नावे 1924 धावा जमा आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या