INDvsBAN : कोहली घेणार ब्रेक; हे तीन खेळाडू करु शकतात ट्वेंटी20मध्ये एण्ट्री

वृत्तसंस्था
Tuesday, 22 October 2019

भारताचा कर्णधार विराट कोहली आगामी बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी20 मालिकेसाठी विश्रांती घेण्याची दाट शक्यता आहे. ही मालिका 3 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. कोहलीने विश्रांती घेतल्यास संगाचे नेतृत्त्व रोहित शर्मा करेल. मात्र, ट्वेंटी20 विश्वकरंडकाला केवळ एक वर्ष उरले असल्याने निवड समिती कोहलीच्या जागी कोणाला स्थान देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आगामी बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी20 मालिकेसाठी विश्रांती घेण्याची दाट शक्यता आहे. ही मालिका 3 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. कोहलीने विश्रांती घेतल्यास संगाचे नेतृत्त्व रोहित शर्मा करेल. मात्र, ट्वेंटी20 विश्वकरंडकाला केवळ एक वर्ष उरले असल्याने निवड समिती कोहलीच्या जागी कोणाला स्थान देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कोहलीच्या जागी संघात तीन खेळाडूंपैकी एकाला जागा मिळू शकते असे आम्हाला वाटते. कोहलीला ट्वेंटी20 मालिकेत विश्रांती देऊन मग पुन्हा कसोटी मालिकेसाठी फ्रेश पुनरागमन करता येईल असा निवड समितीचा विचार असले. 

त्याच्या जागी संघात या तीन खेळाडूंपैकी एकाला स्थान मिळू शकते. 

1. मयांक अगरवाल- मयांक अगरवाल सध्या तुफान फॉर्मात आहे. कसोटी क्रिकेटमध्ये नुकतेच त्याने द्विशतक केले आहे. मात्र, त्याला अजूनही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हवी तशी संधी मिळालेली नाही. विश्वकरंडकात विजय शंकरऐवजी जागा मिळूनही त्याला खेळता आले नव्हते. 

2. दिनेश कार्तिक- ही कार्तिकसाठी अखेरची संधी असू शकते. विजय हजारे करंडकात दिनेश कार्तिकने चांगली कामगिरी केली आहे. तमिळनाडू संघाचे नेतृत्त्व करताना त्याने चांगली फलंदाजी केली आहे. 

3. शुभमन गिल- 19 वर्षांखालील विश्वकरंडकात चांगली कामगिरी केल्यापासून त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची आशा होती. त्याला गेल्या वर्षी एकदिवसीय संघात स्थान मिळालेदेखील. मात्र, त्याला छाप पाडता आली नाही. आता मात्र, ही त्याच्यासाठी चांगली संधी ठरु शकते.


​ ​

संबंधित बातम्या