#क्रिकेट_डायरी : 'जन्टलमेन्स गेम'मधील अति आत्मविश्वासाचे किस्से

टीम ई-सकाळ
Saturday, 27 June 2020

अति उत्साहाच्या भरात दाखवलेला अति आत्मविश्वासामुळे खेळाडूंना चांगलीच महागात पडला आहे. याचा संघालाही फटका बसल्याच्या अनेक घटना क्रिकेटच्या मैदानात घडल्या आहेत. #क्रिकेट_डायरी  या हॅशटॅगच्या माध्यमातून आपण यावरच एक नजर टाकणार आहोत.

मुंबई : क्रिकेट हा जन्टलमेनचा गेम आहे. पण या खेळात स्लेजिंगचा भडिमारही पाहायला मिळतो. खेळाच्या मैदानात जिंकण्याच्या इराद्याने उतरल्यानंतर अति उत्साहाच्या भरात खेळाडू अनेकदा एकमेकांशी मैदानावर शाब्दिक चकमक करुन एकमेकांसमोर पंगा घेताना अनेक सामन्यात पाहायला मिळाले आहे. अति उत्साहाच्या भरात दाखवलेला अति आत्मविश्वासामुळे खेळाडूंना चांगलीच महागात पडला आहे. याचा संघालाही फटका बसल्याच्या अनेक घटना क्रिकेटच्या मैदानात घडल्या आहेत. #क्रिकेट_डायरी  या हॅशटॅगच्या माध्यमातून आपण यावरच एक नजर टाकणार आहोत.  
#) स्टीव स्मिथ Vs इंग्लंड 

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिका ही चांगलीच प्रतिष्ठेचे होते. याच मालिकेत 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने केलेले विधान चांगलेच गाजले होते. आमचा सामना कोणीच करु शकत नाही, अशा आशयाचे विधान त्याने मालिकेपूर्वी केले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दौऱ्यावर बहरदार कामगिरी करुन आत्मविश्वास उंचावलेल्या  स्मिथचे हे वाक्य अति आत्मविश्वासाने बहरलेले होते. मैदानात उतरल्यानंतर इंग्लंडच्या संघाने त्याचे वक्तव्य अति आत्मविश्वासाचा नमुना असल्याचे दाखवून दिले होते. इंग्लंडने ती मालिका 3-2 ने जिंकली होती. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 169 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. मात्र तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुन्हा आघाडी घेतली. या सामन्यात त्यांनी 8 गडी राखून विजय मिळवला. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 78 धावांनी पराभूत करत इंग्लंडने मालिका आपल्या खिशात टाकली.  

क्रिकेटचा धर्मग्रंथ सचिनला विसरला!​

#) एबी डिव्हिलियर्स vs इंग्लंड 

दक्षिण अफ्रीकेच्या संघाचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सलाही अति आत्मविश्वास चांगलाच अंगलट आला होता. इंग्लंडच्या संघानेच त्याची गोची केली होती. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी एबीने इंग्लिश ताफ्याला गोलंदाजीत धार नसल्याचे विधान केले होते. पत्रकार परिषदेत त्याने मोठ्या आत्मविश्वासाने गोलंदाजांमध्ये अनुभव नसल्याची बात केली. पण प्रत्येक्षात मैदानात उतरल्यावर त्याला इंग्लिश गोलंदाजासमोर तग धरता आला नव्हता. चार सामन्यांच्या मालिकेत एबी तीन वेळा शून्यावर बाद झाला. इंग्लंडला सहज पराभूत करण्याची भाषा करणाऱ्या एबीच्या संघाला इंग्लंडने 2-1 असे पराभूत केले होते.  

'बॉलीवूडसारखी घराणेशाही क्रिकेटमध्ये नाही...'

 
#) एंड्रू फ्लिंटॉफ vs भारत

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात केलेली षटकारांची आतषबाजी प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी अविस्मरणीय अशीच आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवीने  स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकातील सहा चेंडूवर सहा षटकार खेचले होते. भारतासाठी 'करो वा मरो' अशी स्थिती असलेल्या सामन्यात युवराजच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाला यश मिळाले. युवीने एका मुलाखतीमध्ये या सामन्यातील धमाकेदार खेळीवर भाष्य करताना सामन्यादरम्यान फ्लिंटॉफसोबत झालेल्या शाब्दिक वादावादीवर भाष्य केले होते. युवीच्या शॉटमध्ये ताकद नाही, अशा आशयाचे वक्तव्य फ्लिंटॉफने केले. त्याचा हिशोब युवीने ब्रॉडच्या षटकात पूरा केला. परिणामी इंग्लंडला हा सामना गमवावा लागला होता.  


​ ​

संबंधित बातम्या