2021 चा विश्वकरंडक भारतातच अपेक्षित

संजय घारपुरे
Thursday, 6 August 2020

भारतात 2021 मध्ये होणारी विश्वकरंडक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा त्याचवर्षी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणारी 2020 ची विश्वकरंडक स्पर्धा 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : भारतात 2021 मध्ये होणारी विश्वकरंडक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा त्याचवर्षी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणारी 2020 ची विश्वकरंडक स्पर्धा 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. 

हमी घेतो तुम्ही या ; इंग्लंडला पाकचा प्रस्ताव 

आयसीसीने 2020 चा विश्वकरंडक लांबणीवर टाकण्याची घोषणा करताना 2021 तसेच 2022 च्या विश्वकरंडक ट्वेंटी-20 स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या, पण त्याचे यजमान जाहीर करणे टाळले आहे. भारतात 2023 मध्ये विश्वकरंडक एकदिवसीय स्पर्धा आहे, त्यामुळे भारतीय मंडळ 2022 च्या विश्वकरंडक ट्वेंटी-20 स्पर्धेस तयार नाही. आता या दोन विश्वकरंडक ट्वेंटी-20 स्पर्धेबाबत भारतीय मंडळ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया पदाधिकाऱ्यात चर्चा अपेक्षित आहे. आयसीसीच्या कार्यकारीणीची शुक्रवारी ऑनलाईन बैठक आहे, त्यावेळी या दोन देशांच्या प्रतिनिधीत चर्चा होण्याची शक्यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या