टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांसाठी 2021 हा शेवटचा पर्याय : आयओसी प्रमुख

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद हे जपानकडे आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगीत करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा धोका कायम राहिला तर स्थगीत स्पर्धा रद्द देखील कराव्या लागू शकतात. अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) प्रमुख थॉमस बॅच यांनी टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी 2021 हा शेवटचा पर्याय असून त्यापुढे स्पर्धा स्थगीत करता येणार नाहीत असे सांगीतले आहे. पुढच्या वर्षीपर्यंत जर कोरोना व्हायरस माहामारीवर नियंत्रण मिळवता आले नाही तर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करावी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद हे जपानकडे आहे. कोरोना व्हायरसचा वाढता विळखा लक्षात घेऊन जगभरातील खेळाडूंच्या आरोग्याचा विचर करत जापानने ही स्पर्धा मार्च महिन्यात टोकियो 2020 ऑलिम्पिक  स्पर्धाना 23 जूलै 2021 पर्यंत स्थगीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “मी जपानची अडचण समजू शकतो, तुम्ही नियोजन समितीतील चार ते पाच हजार लोकांची नियुक्ती कायमस्वरुपी ठेऊ शकत नाहीत, तसेच सगळ्या जगभरातील क्रीडा नियोजन बदलत खेळाडूंना अनिश्चीत स्थितीमध्ये जास्त काळ ठेवणे शक्य नसते.” असे मत बॅच यांनी यावेळी सांगीतले.

"मान्सून संपल्यावरच क्रिकेट पुन्हा सुरु होईल! "

कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलिया, कॅनेडा या देशांनी त्यांच्या देशाचे संघ ऑलिम्पिकसाठी पाठवण्यास नकार दिला होता. जगभरातून वाढता दबाव पाहात स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या कोरोना व्हायरस पसरत असताना देखील खबरदारी घेत क्रिडा स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या