2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण: डी सिल्वाची कसून चौकशी, आता उपुल थरंगाचा नंबर ?

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

श्रीलंकेचे माजी क्रिडा मंत्री महिंदानंदा अलुथगामे यांनी, 2011 च्या विश्वचषकातील  भारत-श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता.

2011 मधील विश्वचषकादरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली अप्रतिम कामगिरी करत विश्वचषक मिळवला होता. त्यावेळेस भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत केले होते. मात्र त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. श्रीलंकेचे माजी क्रिडा मंत्री महिंदानंदा अलुथगामे यांनी, 2011 च्या विश्वचषकातील  भारत-श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. यावर श्रीलंकन सरकारने या प्रकरणाची फौजदारी दखल घेत, मागील आठवड्यात महिंदानंदा अलुथगामे यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील सलामीवीर उपुल थरंगाची चौकशी करण्यात येणार आहे.

ला लिगा : लियोनल मेस्सीने केला ७०० वा गोल, मात्र सामना अनिर्णित                       

श्रीलंकेचे तत्कालीन क्रिडामंत्री महिंदानंदा अलुथगामेगे यांनी जून महिन्याच्या सुरवातीला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान, 2011 चा विश्वचषक श्रीलंकेने गमावला नव्हता तर तो विकला असल्याचे म्हटले होते. तसेच त्यावेळेस आपण देशाचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे ही गोष्ट बोलता आली नसल्याचे म्हणत, अलुथगामेगे यांनी अंतिम सामन्यात श्रीलंका जाणीपूर्वक पराभूत झाला असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारे फिक्सिंगचा प्रकार घडला नसल्याची प्रतिक्रिया, श्रीलंकेच्या तत्कालीन क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी दिली होती. यासोबतच आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले होते. 

सेरी ए फुटबॉल : जीनोआ विरुद्ध क्रिस्टियानो रोनाल्डोचा रॉकेट गोल 

मात्र त्यानंतर श्रीलंकेचे सध्याचे क्रिडा मंत्री डल्लास अलाहाप्पेरूमा यांनी या प्रकरणावर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. व प्रत्येक दोन आठवड्यानंतर चौकशीसंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. आता श्रीलंकेत या प्रकरणावर फौजदारी चौकशी सुरु झाली असून, 2011च्या फायनलसाठी म्हणून श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि संघाचा मुख्य निवडकर्ता असलेल्या अरविंदा डी सिल्वा यांना काल मंगळवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर आता 2011 च्या भारत-श्रीलंका अंतिम सामन्यादरम्यान खेळलेला श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगा याला पोलिसांच्या विशेष पथकाने चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.    

कोरोनामुळे आता फुटबॉल मधील 'ही' स्पर्धा रद्द               

 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत-श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. व श्रीलंकेच्या महेला जयवर्धने याने शतकी खेळी करत भारतासमोर 275 धावांचे आव्हान ठेवले होते. यानंतर सलामीवीर गौतम गंभीरच्या 97 धावा आणि महेंद्रसिंह धोनीने केलेल्या नाबाद 91 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे या विजयासह दोन दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते.


​ ​

संबंधित बातम्या