2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...

टीम ई-सकाळ
Saturday, 1 August 2020

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रविचंद्रन अश्विनच्या 'डीआरएस विथ एश' या यूट्यूब कार्यक्रमात, अनिल कुंबळेने क्रिकेट कारकीर्दीच्या अविस्मरणीय प्रवासावर बोलताना 2007-08 मधील भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भाष्य केले.

भारताचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळेने सर्वाधिक कसोटी विकेट घेण्याचा विक्रम रचला आहे. अनिल कुंबळेने निवृत्तीनंतर मधल्या काही काळासाठी संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील धुरा सांभाळली होती. त्यानंतर आता अनिल कुंबळेने 2007-08 मधील भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर, हा दौरा अर्धवट सोडून परतण्याचा पर्याय ठरू शकला असता. मात्र संघाने हा दौरा सुरू ठेवला कारण कठीण परिस्थितीत देखील उर्वरित सामने जिंकून जगासमोर उदाहरण प्रस्तुत करण्याला प्राधान्य दिल्याचे अनिल कुंबळेने सांगितले आहे.     

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रविचंद्रन अश्विनच्या 'डीआरएस विथ एश' या यूट्यूब कार्यक्रमात, अनिल कुंबळेने क्रिकेट कारकीर्दीच्या अविस्मरणीय प्रवासावर बोलताना 2007-08 मधील भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भाष्य केले. '' कर्णधार म्हणून तुम्हाला मैदानावर निर्णय घ्यावे लागतात. मात्र या दौऱ्यावर मला मैदानाबाहेर असलेल्या गोष्टीचा सामना करावा लागला आणि खेळाच्या हिताचा निर्णय घ्यावा लागला. साहजिकच आम्हा सर्वांना एक संघ म्हणून एकत्र उभे रहावे लागले, पण आव्हान असे होते की टीम इंडिया हा दौरा सोडून परत माघारी येऊ इच्छित असल्याची चर्चा अधिक होती. आणि हा दौरा अर्धवट सोडून परतण्याचा पर्याय ठरू शकला असता. मात्र, संघाने हा दौरा सुरू ठेवला कारण विषम वेळी देखील राहिलेले सामने जिंकून जगासमोर एक उदाहरण ठेवण्याचा हेतू होता,'' असे अनिल कुंबळेने सांगितले. 

तसेच, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर कर्णधार आणि एक संघ म्हणून मालिका जिंकण्यासाठी गेलो होतो. परंतु दुर्दैवाने पहिले दोन निकाल भारताच्या बाजूने नव्हते. आणि या मालिकेचा सर्वोत्कृष्ट निकाल अनिर्णित असायला हवा होता कारण दोन कसोटी सामने खेळायचे बाकी होते आणि फक्त संघासोबत एकत्र उभे रहाण्याची इच्छा होती, असे अनिल कुंबळेने या संवादादरम्यान सांगितले.    

यू.एस ओपन मधून जागतिक टेनिसपटू एश्लीग बार्टीची माघार  

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2007-08 च्या अ‍ॅलन-बॉर्डर कसोटी मालिकेमध्ये सिडनी येथील दुसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्स यांच्यात वाद झाला होता. तसेच या सामन्यात पंचांनी देखील भारतीय संघाविरुद्ध दिलेल्या खराब निर्णयामुळे हा सामना चांगलाच वादग्रस्त ठरला होता. हरभजन सिंग आणि अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्स यांच्यातील वादानंतर, हरभजन सिंगवर अँड्र्यू सायमंड्सवर वर्णद्वेषी टीका केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हरभजनला तीन कसोटी सामन्यांसाठी बंदी घातली होती.

आयसीसीच्या या निर्णयाविरूद्ध भारताने अपील केले होते व त्याच वेळेस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून माघारी येण्याची चर्चा सुरु झाली होती. नुकतेच या मालिकेत पंच म्हणून राहिलेल्या स्टीव्ह बकनर यांनी, या सिडनी सामन्यात निर्णय देताना आपली चूक झाल्याची कबुली दिली आहे.          


​ ​

संबंधित बातम्या