मुंबई क्रिकेट निवड समितीतून दोन सदस्यांची हकालपट्टी

वृत्तसंस्था
Friday, 8 November 2019

मुंबई क्रिकेट संघटनेत मोठी घडामोड घडली आहे. सिनियर खेळाडूंच्या संघ निवडीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून दोन सदस्यांचा बाहेरचा रस्ता दाखवण्याची कारवाई विजय पाटील यांच्या समितीने घेतला आहे.

मुंबई - मुंबई क्रिकेट संघटनेत मोठी घडामोड घडली आहे. सिनियर खेळाडूंच्या संघ निवडीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून दोन सदस्यांचा बाहेरचा रस्ता दाखवण्याची कारवाई विजय पाटील यांच्या समितीने घेतला आहे.

त्याचबरोबर संघातून वगळण्यात आलेल्या तुषार देशपांडेची अतिरिक्त खेळाडू म्हणून सरावासाठी निवड करण्यात आली आहे. 

मुश्‍ताक अली राष्ट्रीय ट्‌वेन्टी-20 स्पर्धेसाठी मुंबईचा संघ दोन दिवसांपूर्वी निवडण्यात आला. त्यात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला वगण्यात आले यावरून मोठे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते.

अनेक तक्रारी करण्यात आल्या. अखेर एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या अपेक्‍स कॉन्सिलने आज तातडीने बैठक बोलवली. 

या बैठकीत सर्व बाजू तपासल्यानंतर निवड समितीतील सदस्य संजय पाटील आणि प्रदीप कासलिवाल यांची हकालपट्टी करण्याचा निर्यण घेण्यात आला.

मिलिंद रेगे (अध्यक्ष), श्रीधर मांडले आणि गुरू गुप्ते हे तीन सदस्य कायम राहिले, परंतु ही समिती आता हंगामी समिती झाली आहे. 

या समितीने तुषार देशपांडेवरील अन्याय दूर करत त्याची संघात अतिरिक्त खेळाडू म्हणून नियुक्ती केली आहे, त्याला संघात कायम ठेवायचे की नाही याचाही अंतिम निर्णय ही समिती घेईल, असे मुंबई क्रिकेट संघटनेकडून कळवण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या